प्रतिष्ठा न्यूज

खासदार संजयकाका पाटील यांचा कवठेमहांकाळ तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा ; मताधिक्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते सरसावले

प्रतिष्ठा न्यूज
कवठेमहांकाळ प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी आज सकाळी कवठेमहांकाळ तालुक्यात झंझावाती दौरा केला.
कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी, शिरढोण, मळणगाव, जाय गव्हाण, बोरगाव, आलकूड एम्, हारोली, देशिंग, खरशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, करोली टि, सराटी, कोगनोळी, रामपूर व हिंगणगाव या गावांमध्ये सभा आणि बैठका घेतल्या. या भाजपा सह महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते दौऱ्यात सहभागी झाले होते. संजयकाका पाटील यांच्या विजयाची हॅटट्रिक बहुमताने करण्यासाठी कार्यकर्ते व नेते आजपासूनच प्रचारात हिरिरीने सहभागी झाले.
संजयकाका पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि सांगली लोकसभेत महायुतीच्या महाविजयासाठी आवाहन केले.
हरोली ता.कवठेमहांकाळ येथे शिवसेना नेते दिनकर पाटील यांच्या घरी भाजपा प्रणित महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांना प्रचाराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शिंदेवाडीचे माजी सरपंच विष्णू शिंदे, भाजपा तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुक प्रमुख प्रभाकरबाबा पाटील, मारुती बुधगिरे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरढोण, हारोली, हिंगणगाव आणि विठुरायाचीवाडी येथे सभा घेण्यात आल्या.
या दौऱ्यात खासदार संजय काका पाटील यांच्याबरोबर दिनकर पाटील, जनार्दन पाटील, रमेश खोत, विक्रम कोळेकर, अमित शिंदे, तानाजी यमगर, हिंमत पाटील, शशी पवार, मोहन खोत, धनाजी माळी, नितीनआमुने, संजय कोळी, सुहास भोसले, महादेव सूर्यवंशी, डॉ. भीमराव कोळेकर, चंद्रकांत लोंढे, श्यामराव येरळे यांच्यासह भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय या माहायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते सहभागी झाले होते.
कवठेमहांकाळ तालुक्यातून खासदार संजयकाका पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्ते सरसावले असून विविध ठिकाणी होणाऱ्या बैठका व सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.