प्रतिष्ठा न्यूज

सांगली शिक्षण संस्थेच्या तासगाव संकुलात भारतीय शिक्षण मंडळामार्फत वसंत पंचमी कार्यक्रम संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : भारतीय शिक्षण मंडळ नेहमीच भारतीय संस्कृतीशी संबंधित असणाऱ्या उपक्रमांचे आयोजन निरंतर करत असते,त्याच अनुषंगाने भारतीय शिक्षण मंडळ तासगाव यांचे वतीने दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी सांगली शिक्षण संस्थेच्या तासगाव संकुलात वसंत पंचमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला पटवर्धन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जोग सर,गोखले प्राथमिक शाळेचे अधिक्षक श्री सोनूरे सर तसेच दोन्ही शाळांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.याप्रसंगी चंपाबेन शाळेचे श्री नितीन जोशी यांनी वसंत पंचमीचे महत्व मनोगतातून सांगितले. कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. जोशी यांनी वसंत पंचमी निमित्त सर्व शिक्षकांना तसेच भारतीय शिक्षण मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. आभार व्यक्त करताना चंपाबेनचे मुख्याध्यापक श्री जोग यांनी भारतीय शिक्षण मंडळाचे कार्य व मंडळाच्या आगामी काळातील योजना तसेच चैत्रपाडवा रंग भरण स्पर्धा या संदर्भात माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे कार्यकर्ते श्री.केंगले यांनी केले.वसंत पंचमी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.