प्रतिष्ठा न्यूज

संयोगिता केंब्रिज स्कूल प्रिप्रायमरी : बालशिवाजींची गौरवगाथा..!

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : आम्ही गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या संयोगिता केंब्रिज स्कूल प्रिप्रायमरीच्या छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्याने आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो. सोबत प्राचार्य गजबर सर आणि अधीक्षक प्राचार्य ख्रिस्तिना मार्टिन मॅडम होते. राजमाता जिजाऊ आणि छ. शिवाजी महाराजांच्या वेषभूषेत आपली निष्पाप चिमुकली लेकरं शाळेत पाठवलेल्या पालकांचं आम्ही पहिल्यांदा अभिनंदन केलं.. अशा बालशिवाजींची मांदियाळी निर्माण करण्यासाठी पृथ्वीराज बाबांच्या कष्टाचा उल्लेख आपसूकच आला. तसं बालवाडीतील छोट्या लेकरांना शिक्षण देणं ही फार मोठी गोष्ट आहे. छोट्याबरोबर छोटं होऊन त्यांच्यावर संस्कार करणे ही मोठी कसरत असते. समन्वयक वंदना डोंगरे आणि त्यांच्या सर्व सहकारी स्टाफचा उदंड उत्साह आणि धडपड ही नजरेत भरणारी होती. अशा उपक्रमातून होणारे कृतीयुक्त मूल्यसंस्कार शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महत्वाची भूमिका बजावतात आणि मग संस्थेच्या उद्दिष्ट पूर्तीचा मार्ग सुकर होतो. पाळणा आणि बालशिवाजींचं कौतुक पाहून ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उध्दारी’ हे राजमाता जिजाऊंनी दाखवून दिलं हा उल्लेख अपरिहार्य आहे एवढे मात्र निश्चित..!

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.