प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगडच्या ४२ विद्यार्थ्यांची “कॉग्निझंट” कंपनीत निवड

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनीधी : कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पोरेशन ही एक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील शिक्षण घेतलेल्या ४२ विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या “कॉग्निझंट” कंपनीत कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील जोत्सना राऊत, आबासाहेब माने, गणेश वाघमारे, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील राकेश देशमुख, रोहित मुंगसे, विशाल फुले, माधुरी फराडे, आरती येमूल, सोनाली जाधव, साहिल जोशी, सौरभ वांगीकर, शुभम बाबर, सचिन रवी, रोहित चव्हाण, सुप्रिया लेंगरे, आसावरी नरळे, दिपाली घाडगे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील शितल मुंडलिक, ज्ञानेश्वरी शिंदे, भाग्यश्री भुसे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील उमा गायकवाड, श्वेता भादुले, चांगदेव भुईकर, सुरज राऊत, संतोष वाघमारे, सुहास लोहार, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील आण्णासाहेब लोंढे, श्रीवरद चव्हाण, पृथ्वीराज पाटील, अनिरुद्ध जोशी, ओंकार परदेशी, अथर्व माने, अभिषेक घोटगे, रोहन देशमुख, वेदांत उत्पात, मंथन नाझरकर, मयुरी बिले, मयुर कुलकर्णी, रविकांत वंडराव, अभिजित पवार, ओंमकार माने, संग्राम देशमुख आदी ४२ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून ४ लाख ते ५.४० लाखांचे वर्षिक पॅकेज मिळाले आहे.
सिंहगड काॅलेज पंढरपूर येथील ४२ विद्यार्थ्यांची माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामांकित कॉग्निझंट बहुराष्ट्रीय कंपनी निवड झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
“काॅग्निझंट” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.