प्रतिष्ठा न्यूज

सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट, महाराष्ट्र राज्य यांचा पाचवा ब्रँड ऑफ महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार २०२३ ने सी. ए. श्री. शंकर अंदानी सन्मानित

शैक्षणिक व आर्थिक पुस्तकाने ग्रंथतुला

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर येथील धम चारिटेबल ट्रस्ट व सेकुलर प्रोग्रेस्सिव फ्रंट या संस्थेतर्फे समाज कार्यात वाहून घेतलेल्या व धम विचार व प्रसार करणारे तसेच संपूर्ण जीवन निस्वार्थ पणे समाज गरीब व शोषित जनतेसाठी वाहिलेल्या एका व्यक्तीला ब्रँड आफ महाराष्ट्र, जीवन गौरव पुरस्कार व पूर्ण जीवन धाम प्रसार करणारे व्यक्ति अल धाम संगिनी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
२०२३ चे पाचवे ब्रँड आफ महाराष्ट्र, जीवन गौरव पुरस्कार जो समाजात अत्यंत मनाचा व प्रतीष्ठेचा साहित्य क्षेत्र व कला क्षेत्र अत्यंत उच्च असा पुरस्कार अहमदनगर येथील सि ए शंकर घन्शामदास अंदानी यांना जाहीर करण्यात आला होता.
रविवार दिनांक ०७/०५/२०२३ रोजी राजश्री शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे धाम विचारक माजी खासदार श्री जोगेंद्र कवाडे, मराठी चित्रपट अन्हीनेता श्री मिलिंद शिंदे, जेष्ठ विचारवंत श्री सुरेश वाघमारे, प्रा. किसनराव कुन्हाडे, बचाराम कांबळे, करुणा विमल. च्या पाटील, अनिल म्हमाणे व अनेक धाम विचारवंत यांचे उपस्थितील गुरु बुद्ध यांचे जयंती निमित एक दिवसीय सत्याशोदक धाम परिषद चे आयोजन करण्यात आले.
सदर परिषदेमध्ये धम चारिटेबल ट्रस्ट व सेकुलर प्रोग्रेस्सिव फ्रंट या संस्थेतर्फे चे पाचवे ब्रँड ऑफ महाराष्ट्र, जीवन गौरव पुरस्कार २०२३ हा पुरस्कार अहमदनगर येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल सि ए शंकर घन्शामदास अंदानी यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार हे मानपत्र, रुपय दहा हजार रोख रुपये १५००० ची साहित्य पुस्तके, असे होते. सदर पुरस्कार मध्ये श्री शंकर अंदानी यांची सामाजिक ग्रंथांनी ग्रंथ तुला करण्यात आली.
सदर ग्रंथ तुलेतील अंदाजे रुपये एक लाख ची पुस्तके श्री शंकर अंदानी यांनी गरीब व अनाथ मुळे यांचे शिक्षणासाठी दान केली. तसेच पुरस्कार राशी ही फिल्म क्लूब ला दान करून टाकली.
त्यांच्या या मनाचे मोठेपणा व उदारतेचे सर्वत्र कौतुक झाले तसेच असे अत्यंत मोजके व्यक्तिमत्व देशात आहेत असे गौरव उद्गार अनेक प्रमुख पाहुणे यांनी केले. तसेच सदर निस्वार्थ पणे समाज सेवा व द्यानाची सेवा करणारे सिए हे सुधा एक समजा साठी आदर्श आहेत.
सिए शंकर अंदानी हे मागील अनेक वर्षा पासून समाज कार्य करीत आहेत तसेच त्यांचे कामकाज व्यवसाय हे अनेक मंदिर, धर्म शाळा, सामाजिक संस्था, चर्च, मस्जिद तसेच अनेक सामाजिक संस्था यांचे कामकाज अत्यंत अल्प दारात किंवा विना मूल्य करीत आहेत.
अंदाजे ३६४ मंदिर, मस्जिद, चर्च, सामाजिक संस्था यांचे विनामूल्य कामकाज २०२२ मध्ये त्यानी केले व मागील १५ वर्ष पासून सदर ज्ञान सेवा ते करीत आहेत ..
तसेच अनेक सामाजिक संस्था यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांचे आर्थिक दप्तरे योग्य रित्या कसे ठेवावे, की की कागदपत्रे शाषकीय कार्यालयामध्ये सादर करावी, कर कसे भरावे हे समाज उपयोगी ज्ञान सेवा ते करीत आहेत. भारतातील सर्व स्थरातील उत्कर्ष कार्य व विक्रम करणे करिता सदर संस्था एका वर्षी फक्त एक व्यक्तींना त्यांचे कार्य व कामकाज यांची पूर्ण पणे छाननी व तपासणी करून जीवन गौरव पुरस्कार प्रदान करीत असते.

अहमदनगर येथील सी ए (DR) श्री शंकर घन्शामदास अंदानी यांना यापूर्वी युनायटेड नेशन अमेरिका, राष्ट्र अध्यक्ष कार्यालय अमेरिका या कार्यालयाचा मेडल ऑफ EXCELLENCE, उत्कृष कार्य नोंद, हा अत्यंत मनाचा सर्वोच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे

तसेच त्यांची इंडिया बुक आफ रेकार्ड व आशिया बुक आफ रेकार्ड तसेच एकूण ४१ जागतिक रेकॉर्ड मध्ये सी ए श्री शंकर अंदानी यांची नोंद झालेली आहे.यापूर्वी आज पर्यंत जवळ पास १५०० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कर मिळाले आहेत.श्री शंकर अंदानी हे व्यवसायाने सि ए. आहेत ते श्री साई बाबा संस्थान टस्ट शिर्डी यांचे मागील १४ वर्ष पासून कर सालागार आहेत. तसेच अहमदनगर महानगर पालिका यांचे ते मागील १५ वर्ष पासून कर सलागार आहेत तसेच अनेक शासकीय व बँक यांचे ते लेखा परीक्षक व कर सलागार आहेत.

सदर पुरस्कार करिता शिर्डी चे खासदार श्री सदाशिव लोखंडे अहमदनगर चे आमदार श्री अरुण काका जगताप, आमदार श्री संग्राम जि जगताप, पारनेर चे आमदार श्री निलेश लंके साहेब, आमदार रोहित दादा पवार, माजी आमदार श्री विजय औटी साहेब, महापौर सौ रोहिणी शेंडगे व महानगर पालिका आयुक्त श्री पंकज जावळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर बाबा साहेब वाकळे, माजी महापौर कदम, शिवसेना शहर अध्यक्ष संभाजी कदम, माजी सभापती श्री अविनाश घुले, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, श्री दत्ता कावरे, श्री परेश लोखंडे, श्री संजय चोपडा, अहमदनगर सिधी समाज अध्यक्ष श्री महेश मध्यान तसेच अनेक सन्माननीय लोकांनी – सी ए श्री शंकर अंदानी यांचे अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.