प्रतिष्ठा न्यूज

संत नामदेव महाराज मठ संस्थानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळयात सहा जोडपी विवाहबद्ध

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संत नामदेव महाराज मठ संस्थान बारूळ च्या वतीने नुकताच कौठा येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळयात सहा जोडपी विवाहबद्ध झाली.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. संत गुरूवर्य नामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी कौठा येथील नागरिकांनी परिश्रम घेतले.
यावेळी माजी आ. श्री गुरूनाथराव कुरूडे, सामाजिक कार्यकर्त्या तथा शे. का.प.प्रदेश अध्यक्षा सौ.आशाताई श्यामसुंदर पाटील शिंदे,माजी आ.श्री रोहिदासराव चव्हाण,भाजपा युवा नेते श्री प्रवीण पाटील चिखलीकर,जि.प.सदस्य विजय पाटील धोंडगे, श्री पुरूषोत्तम धोंडगे, श्री मोतीराम पवार,डॉ.सुनील देशमुख,डॉ. नितीन अंबेकर आदिजण उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.