प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हास्तरावर नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मधूनच एक प्रतिनिधी मंडळाचे “अध्यक्ष” पदी नियुक्त करा‌ : संजय कांबळे यांची मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सहाय्यक कामगार आयुक्त सो, सांगली जिल्हा यांच्या मार्फत मा. कामगार मंत्री तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा आदरणीय ॲड. प्रकाश तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हास्तरावर नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मधूनच एक प्रतिनिधी मंडळाचे “अध्यक्ष” पदी नियुक्त करा‌. अशी मागणी लेखी निवेदन देऊन केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदन द्वारे मंडळाला असे म्हटले आहे की,
आद.ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर संस्थापक अध्यक्ष यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या मार्फत कळविण्यात येत आहे की,
श्रमिक, कष्टकरी, मोलमजुरी, काबाडकष्ट करीत असणारे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय तसेच त्यांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे व आपल्या आईवडिलांच्या बरोबरच भारत देशाचे नाव उज्ज्वल व लौकिक करावेत म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने विविध प्रकारचे बांधकाम कन्स्ट्रक्शन्स माध्यमातून जमा होण्याऱ्या उपकरा मधून बांधकाम कामगारांच्या हक्काचा रक्कमेतून नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी हितासाठी हक्काचे मंडळ स्थापन केले गेले आहे. सद्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी मा. कामगार मंत्री यांची नियुक्ती केले असून ते संपूर्ण राज्याचा कारभार पाहात आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम कामगार मंडळाच्या धोरणात्मक निर्णयात बरेच फेरबदल करण्यात आले आहेत. काही खाजगी कंपनीला विविध कामांसाठी ठेके देवून खाजगीकरण अधिकच मजबुत करीत असल्याचे दिसून येत आहे. आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या मार्फत वरचेवर आपणास व शासनास कळवीत आहोत की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात बांधकाम कामगारांचीच शिक्षित मुलांना त्यांच्या शैक्षणिक पात्रते नुसार सरळसेवा भरतीसाठी निवड करावी. कारण कामगारांचे कल्याणकारी हिताच्या योजनेच्या नावाखाली खाजगी कंपनीला पोसण्यासाठी कामगाराचा मंडळात जमा असलेल्या हक्काचा पैशाची खिरापत वाटण्यात येत आहे. आता शासनाने खाजगी कंपनीचे नोकर भरती करणारा GR (शासन निर्णय) रद्द केला आहे त्यामुळे मंडळाच्या कामासाठी खाजगी तत्वावर खाजगी कंपनीचे कर्मचारी भरले आहेत. त्यांची भरती बेकायदेशीर ठरत असून ती भरती रद्द करून सरळसेवा भरती प्रक्रियेत बांधकाम कामगारांच्या सुरक्षित बेरोजगार मुला मुलींना समाविष्ट करण्यात यावे. हे कामगारांच्या हिताचे व हक्काचे धोरणात्मक निर्णय ठरेल. याचबरोबर विविध प्रकारचे योजनेच्या नावाखाली म्हणजेच मध्यान्ह भोजन, सुरक्षा साहित्य, त्यांचं बरोबर बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी या नावाने कोट्यवधी रुपये आर्थिक भष्टाचार झाला असल्याचे स्थानिक व राज्य स्तरावरील वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच नव्याने सुरू करण्यात आलेली विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य योजना शुभारंभ हा मंडळाचे राज्य अध्यक्ष तथा कामगार मंत्री यांच्या हस्ते तसेच सांगली जिल्हाधिकारी सो यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मोठ्या दिमाखात करण्यात आला.
मंडळाचे मा. सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अप्पर कामगार आयुक्त सो आणि सहायक कामगार आयुक्त सो सांगली हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कामगारांना आरोग्य सेवा तात्काळ पुरविण्यात येणार आहे तसेच अनेक प्रकारच्या आजारावर उपचार करण्यात येतील असे मोठे आश्वासन मा. मंत्रीमहोदय यांनी देले होते. त्यांनी 1800 266 666 666 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा ताबडतोब आपल्या दारात सर्व सुविधा युक्त आरोग्य मोबाईल व्हॅन येईल असे जाहीर आव्हान बांधकाम कामगारांना केले होते. परंतु खरंच कामगारांना उपचारांची गरज असताना 1800 266 666 666 या टोन फ्री नंबरवर संपर्क साधला असता मात्र कोणत्याही आरोग्य सेवा देणारी व्हॅन आलेली नाही. असे बरेच वेळा घडले आहे. सद्यस्थितीत पाहता सर्व सोईनीयुक्त असणारी आरोग्य व्हॅन खाजगी कंपनीच्या लॅब जवळ धुळखात उभी असल्याचे दिसत आहे. मंडळाच्या जवळ जमा असणारे रक्कम ही बांधकाम कामगारांच्या हितासाठी उपयोगी पडणे आवश्यक असताना इकडे मात्र खाजगी कंपनीला वेगवेगळे ठेके देऊन बेहिशोबी वायफट खर्च करून कामगारांची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. वास्तविक कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आधिक पैसे खर्च करणे अपेक्षित आहे. याचबरोबर काही लखपती सदन असणारे लोकांनाही बांधकाम कामगार म्हणून बोगस नोंदणी केल्याचे दिसून येते आहे. कष्टकरी, श्रमिक, मोल मजूरीवरती काम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या तोंडाचा घांस हेरावून घेण्याचा प्रताप काही सदन श्रीमंत लोक करीत आहेत. आशा सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच अंकुश ठेवण्यासाठीच जसे महाराष्ट्र राज्याचे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे राज्य अध्यक्ष मा. कामगार मंत्री महोदय आहेत त्यांचं धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मधून एक प्रतिनिधी निवडून त्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा जिल्हा अध्यक्ष नेमण्यात यावे. जेणेकरून बांधकाम कामगारांच्या अडीअडचणी शासन स्तरावर मांडून सोडविण्यासाठी सोईस्कर होईल. तसेच बोगस कारभार,वाढत्या भष्टाचारवर आळा घालण्यासाठी मोलाची मदत होईल.
तरी वरील सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास व विचार करून ताबडतोब निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मधून एक प्रतिनिधी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात असे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने निवेदन द्वारे मागणी केली आहे.
यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, दिपाली वाघमारे, शिवाजी त्रिमुखे, संदीप कांबळे, बापूसो तोरणे,विक्रम
आठवले,शरद आठवले, धनंजय आठवले, जगदिश कांबळे, प्रदिप मंचद, इसाक सुतार, राहुल व्हनुरे, ज्ञाश्वर खरात, सुभाष पाटील, जावेद आलासे, श्रीराम चौगुले, अनिकेत गैराजे, अक्षय मोरे यांच्या बरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.