प्रतिष्ठा न्यूज

आमदार विक्रमदादा सावंत, यांनी वीज कर्मचारी, अधिकारी अभियंता संघर्ष समितीच्या आंदोलनाला दिला पाठिंबा

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : काँग्रेसचे आमदार विक्रमदादा सावंत यांनी बुधवारी “जत” येथील द्वारसभेत सामील होऊन वीज उद्योग खाजगीकरण धोरणाविरुद्ध वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी आमदार मा. विक्रमदादा सावंत, यांनी अदानी कंपनीच्या माध्यमातून सध्याचे महाराष्ट्र सरकार करत असलेल्या वीज उद्योगाच्या खाजगीकरण धोरणाविरुद्धचा “मुद्दा” पुढच्या आठवड्यात 19 डिसेंबर पासून नागपूर येथे होणाऱ्या “हिवाळी अधिवेशनात” आग्रहाने मांडण्याची ग्वाहीही दिली. तसेच शेतकऱ्यांच्या व जनतेच्या फायद्याचा असलेला वीज उद्योग खाजगीकरणापासून वाचवण्यासाठी एक जनसेवक म्हणून शासन दरबारी आग्रही भूमिका मांडून विरोध करणार असल्याबाबत आश्वासित केले. तसेच येणाऱ्या काळात वीज उद्योग खाजगीकरणाविरुद्ध नागपूर व ठाणे येथे होणाऱ्या मोर्चास व जानेवारीमधील बेमुदत संपास पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
यावेळी सुधीर नलवडे, उमेश माने, प्रवीण फडतरे, आदिनाथ पवार, दिपक जाधव, अशोक खोदानपुरे, श्रीपाद हुद्दार, अनिल कोळी, सुहास काळे, विजय चव्हाण, अशोक देसाई, धनाजी पाटील, सचिन भिंताडे, किशोर वाघ, सुनील कोळेकर, गणेश कुकडे, संदीप नागमोती, विवेक वायफळे, मनोज पाटोळे, राजू लवटे, संतोष कोरे, सचिन माळी, अरविंद वाळके, सुरेश खरमाटे, महालिंग माळी, संतोष निंबाळकर, महेश चव्हाण यांच्यासह कवठेमहांकाळ, जत व संख उपविभाग/शाखा कार्यालय/उपकेंद्र मधील सर्व बाह्यसोत्रत कर्मचारी, कायम कर्मचारी, अधिकारी, अभियंते मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.