प्रतिष्ठा न्यूज

राजमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबीर संपन्न- शिवगर्जना प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : – राजमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबिर व अन्नदान वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 272 रक्तदात्यांनी रक्तदान करून जन्मोत्सव साजरा केला.
  आनंदनगर येथील शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून राजमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने समाज उपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष- गोविंद पाटील मोरे व त्यांच्या सहकार्याच्या मदतीने करण्यात येते. यंदाही “राजमाता माँ जिजाऊ कर्तृत्वान महिला पुरस्कार 2024” चा पुरस्कार आधार हॉस्पिटल मधील स्त्रीरोगतज्ज्ञ- डॉ. स्मिता कदम, यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच रक्तदान शिबीर व अन्नदान वाटप ही करण्यात आले.
  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी- सौ. प्रणिताताई देवरे (चिखलीकर) प्रदेशाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा तर उद्घाटक म्हणून सौ. सुनंदाताई जोगदंड (माजी प्रदेशाध्यक्षा ब्रिगेड) या राहणार आहेत, तर विशेष अतीथित सौ. संध्याताई कल्याणकर, सौ. शोभाताई तिडके, व विशेष उपस्थिती म्हणून श्रीमती वच्छलाताई पुयड (शिवसेनेच्या कार्यकर्त्या तथा माजी जि.प. सदस्या) सौ. डॉ.मनोरमा चव्हाण, सौ. सुचिताताई जोगदंड, सौ. अॅड. प्रियंका कैवारे, सौ. सरिता चिरकले, सौ. प्रिती देवकर, सौ. डॉ. विनया चव्हाण, सौ. सत्यभामा येजगे, सौ. प्रियंका गायकवाड, सौ. संगिता देशमुख, सौ. सुशिला मोरे, सौ. सुनंदाबाई जाधव, आदींची उपस्थिती होती.
  यावेळी स्त्री-पुरुष मिळून 272 जणांनी रक्तदान केले.  त्यामुळे त्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा माँ जिजाऊ स्मृती चिन्ह, तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
  या रक्तदान शिबीररासाठी जिजाऊ ब्लड बँक व जीवन आधार ब्लड बँक यांनी मोलाचे सहकार्य केले. अशी माहिती आयोजक : गोविंद पाटील मोरे व सहकारी- शिवगर्जना प्रतिष्ठान नांदेड, यांनी दिली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.