प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी केली पूर स्थित भागाची पाहणी, नागरिकांना दिला आधार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका सर्व अधिकारी यांची तातडीने बैठक मंगलधाम येथे घेतली होती सदर बैठकीत अधिकारी यांची पूर परिस्थिती वर नियंत्रण ठेवणे कामी जबाबदारी सोपवली होती त्या बाबत आढावा घेऊन सर्वांनी सतर्क राहून पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांना सहकार्य करण्या बाबत सूचित केले आहे. निवारा केंद्र , स्थलांतर साठी वाहन यंत्रणा , पिण्याच्या पाण्याची सोय, इत्यादी बाबी बाबत नियोजन करण्यात आले आहे,
त्या नंतर अधिकारी समवेत सांगली वाडी व सांगलीतील पूरस्थित भागात जाऊन समक्ष पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधताना पूर परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे ,प्रशासन आपल्या बरोबर कोणत्याही परिस्थितीत असणार आहे असे या वेळी सांगितले ,
आयुक्त स्वतः नागरिकांना भेटत असल्याने नागरिकांनी सुध्दा समाधान व्यक्त केले. प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन नागरिकांनी देऊन स्वतःहून स्थलांतर होत असल्याचे देखील सांगितले आहे.
सांगलीवाडी धरण भाग , कदम वाडी इत्यादी ठिकाणी तर सांगली येथील पाटणे प्लॉट, कर्नाळ रोड , इत्यादी ठिकाणी पाहणी केली आहे, नागरिकांना संभाव्य पूर परिस्थिती बाबत सूचना दिल्या आहेत, या वेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ , मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, जन संपर्क अधिकारी धनंजय हर्षद , डॉ .रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी , स्वच्छता निरीक्षक ,सहा आयुक्त सहदेव कावडे इत्यादी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.