प्रतिष्ठा न्यूज

उपळावीचे संदीपकुमार जाधव यांना महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मर्या. मुंबई यांच्यावतीने प्रशिस्तीपत्र देवून गौरव

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : उपळावीचे संदीपकुमार जाधव यांना महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मर्या. मुंबई यांच्यावतीने प्रशिस्तीपत्र देवून गौरविण्यात आले .
उपळावी ता . तासगांवचे सुपुत्र असलेले संदीपकुमार शिवाजीराव जाधव हे 2009 पासून गेली पंधरा वर्षे लेखपाल / लेखाधिकारी म्हणून काम पहात आहेत . त्यांचेकडे मुख्यालय मुंबई असलेल्या राज्य शासन विभागात लेखाधिकारी म्हणून काम पाहिले, सध्या त्यांचेकडे सांगली मुख्यालय असून अतिरिक्त कोल्हापूर, व सातारा या तीन जिल्हयाचा पणन महासंघाचे लेखाधिकरी म्हणून कार्यभार आहे .
केंद्रशासन पुरस्कृत आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत हंगाम २००५-०६ ते २०२३-२०२४ या कालावधीतील धान व भरडधान्य खरेदीवरील अंतिम लेखा परिक्षित विवरणपत्रे (Audited Statement) तयार करुन केंद्रशासनास(Government of India) सादर करण्याकामी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल,संदिपकुमार यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या., व सहसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, ना. पु. २९ मंत्रालय महाराष्ट्र शासन, मुंबई यांचे वतीने गौरविण्यात येऊन प्रशस्तीपत्रक देण्यात आले . त्यांचे या यशाबददल उपळावीसह तासगांव तालुक्यातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.