सावळज गावचे सुपुत्र, माजी सैनिक,सध्या महाराष्ट्र पोलीस दलात पुणे येथे कार्यरत असलेले श्री संजय शिंदे यांच्या मातोश्री स्व. द्रौपदी शिंदे यांनी वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज दि. 17 : सावळज ता. तासगाव येथील द्रौपदी शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
भारतीय सैन्य दलात सेवा बजावून सध्या महाराष्ट्र पोलीस दलात पुणे येथे कार्यरत असलेले श्री संजय शिंदे यांच्या त्या मातोश्री होत्या, त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे, रक्षा विसर्जन शनिवार दि. 19 रोजी सकाळी 9 वाजता सावळज येथे होणार आहे.