प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र नाभिक महामंडळ सांगली जिल्हा नाभिक महामंडळाच्या अध्यक्षपदी जयवंत तात्या सूर्यवंशी तर सांगली जिल्हा सचिव पदी मधुकर गायकवाड यांची फेरनिवड

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज : महाराष्ट्र नाभिक महामंडळ सांगली जिल्हा नाभिक महामंडळाच्या सांगली जिल्हा अध्यक्ष पदी जयवंत तात्या सूर्यवंशी यांची तर जिल्हा सचिव पदी मधुकर गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली त्यांनी केलेल्या निस्वार्थी, व प्रामाणिकपणे सामाजिक कार्याची पोहोच पावती म्हणून त्यांच्या फेर निवडी करण्यात आल्या.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून विशाल गायकवाड यांचीही फेरनिवड करण्यात आली. तसेच यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष पदी नितीन खंडागळे यांची तर तासगाव तालुका युवा अध्यक्ष पदी प्रशांत गायकवाड यांची निवड करण्यात आली.
 अंकलखोप येथे झालेल्या नाभिक समाजाच्या कार्यक्रमामध्ये या निवडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. सयाजी झुंझार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश उपाध्यक्ष मा. सोमनाथ साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मा. बाळासाहेब काशीद ,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा. मारुतीराव टिपूगडे यांच्या उपस्थितीत पार पडल्या या कार्यक्रमास नाभिक समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.