प्रतिष्ठा न्यूज

लोहा तालुका शिवसेना उपतालुका प्रमुखपदी- संतोष पाटील यांची निवड

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :- उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना लोहा उपतालुका प्रमुखपदी कापसी बु येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते संतोष पाटील वडवळे यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख- माधव पावडे यांनी त्यांच्या निवडीचे पत्र दिले असून शिवसेना पक्षप्रमुख- उध्दव ठाकरे, युवा सेनाप्रमुख- आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावेत असे पत्रात म्हटले आहे. त्यांच्या निवडीचे नांदेडचे संपर्कप्रमुख- बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख- माधव पावडे, उपजिल्हा प्रमुख- बाळासाहेब कराळे, मुक्तेश्वर धोंडगे, लातूरचे संपर्कप्रमुख माजी आमदार- रोहिदास चव्हाण, माजी सभापती- सतीश पाटील उमरेकर, तालुका प्रमुख- सुरेश पाटील हिलाल, किसान सेना तालुका प्रमुख- चंद्रकांत पाटील, उपजिल्हा प्रमुख- संजय पाटील ढेपे, तालुका प्रमुख- संजय पाटील ढाले, तालुका संघटक- नागोराव पाटील सिरसाट, हनुमंत जाधव, हनुमंत शिंदे, दत्तराम पाटील वडवळे, प्रमोद मैड, अनिल जलावर यांच्या सह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संतोष पाटील यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.