प्रतिष्ठा न्यूज

तासगावात 30 तारखेला धनगर समाज बांधवांचा महामोर्चा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :तासगाव तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने धनगर समाजाची अनुसूचित जमाती ( एस टी ) आरक्षण अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्यांच्यासाठी समाजाच्या वतीने ३० ऑक्टोबर रोजी महामोर्चाचें आयोजन केले आहे.या संदर्भात तालुक्यातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी तालुका प्रशासनास निवेदन दिले आहे.
जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील,आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांनाही समाज बांधवांच्या वतीने आरक्षणाच्या मागणी सह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे, व राज्य सरकारकडे व केंद्र सरकारकडे आरक्षण संदर्भात पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली.धनगर समाजाचे अनुसूचित जमाती मध्ये ( एस टी ) तात्काळ समावेश करणे यासह अन्य मागण्यांच्यासाठी केंद्र सरकार,राज्य सरकार व तासगाव तालुका प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी तासगाव तालुक्यातील सर्व समाज बांधव आपापले राजकीय पक्ष,गट- तट, संघटना बाजूला ठेवून समाजाच्या उज्वल भविष्यासाठी एकवटले असून ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तासगाव तालुक्यातील हजारो समाज बांधव एकत्र जमून भिलवडी नाका तासगाव येथून महामोर्चाची सुरुवात होणार आहे.हा महामोर्चा भिलवडी नाका येथून बस स्टॅन्ड चौकामध्ये येईल.बस स्थानक चौकामध्ये समाजातील प्रमुख वक्त्यांचे,नेतेमंडळींचे मार्गदर्शन पर भाषण होईल.त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री,खासदार,आमदार, तहसीलदार,मुख्याधिकारी नगरपालिका,पोलीस निरीक्षक तासगाव पोलीस स्टेशन यांना आपल्या सर्व मागण्यांचे निवेदन समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे,
अशी माहिती धनगर आरक्षण कृती समिती तासगांव तालुका यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.