प्रतिष्ठा न्यूज

दिनेश बिदरकर यांचे 57 वेळा रक्तदान नेत्रदान व अवयवदानासाठीही पुढाकार बिदरकर यांचा आदर्श सर्वांसाठीच अनुकरणीय : जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : रक्तदान व अवयवदान हे श्रेष्ठदान असून सामाजिक जाणीवेतून 57 वेळा रक्तदान करणाऱ्या दिनेश मार्तंडराव बिदरगर या रक्तदात्याचा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. नेत्रदान व अवयवदानासाठीही श्री. ‍बिदरगर यांनी घेतलेल्या पुढाकाराचे वर्षा पाटोळे यांनी यावेळी कौतुक केले.

जिल्हा माहिती कार्यालय येथे आज झालेल्या या सत्कार समारंभ प्रसंगी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगलीचे नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे, माहिती अधिकारी एकनाथ पोवार आदि उपस्थित होते.

श्रीमती पाटोळे म्हणाल्या, रक्तदान, अवयवदान, देहदानातून आपण गरजू रूग्णांचा अनमोल जीव वाचवू शकतो. ढवळेश्वर प्लॉट, उल्हासनगर कुपवाड येथील रहिवासी असलेले 64 वर्षीय दिनेश बिदरकर यांनी 57 वेळा रक्तदान करून आपले सामाजिक उत्तरदायित्व जोपासले आहे. त्यांनी मिरज शासकीय महाविद्यालय येथे देहदानाचा तर सांगली सिव्हील हॉस्पीटल येथे नेत्रदानाचे संकल्प पत्र सादर केले आहे. यातून त्यांनी समाजाला चांगला संदेश दिला आहे. श्री. बिदरकर यांच्या या कृतीचे समाजातील सर्वच घटकांनी अनुकरण करून रक्तदान, देहदान व अवयवदान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन श्रीमती पाटोळे यांनी केले.

देहदान व अवयवदानामुळे मृत्यू पश्चात अवयवांचा 7 व्यक्तींना याचा लाभ होतो. मरावे परी देहरूपी, अवयवरूपी उरावे या उक्तीनुसार सर्वांनी अवयवदानासाठी पुढे यावे, असे नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे यांनी सांगितले. श्री. बिदरकर यांनी 57 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचेही ते म्हणाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.