प्रतिष्ठा न्यूज

शांतिनिकेतन कन्या शाळेत व्यक्तीमत्व विकासासाठी विविध उपक्रम संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मुलींच्या कलागुणांचा सर्वांगीण विकास करून प्रत्येक विद्यार्थिनीला अनेक उपक्रमात सहभागी करून घेत अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याकरिता शांतिनिकेतन कन्या शाळा दरवर्षी विविध उपक्रम राबवत असते.
यावर्षी माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करत कार्यक्रम यशस्वी करण्यात आले.

आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट व जिल्हा मानसिक आरोग्य विभागाच्या वतीने सामान्य मानसिक आरोग्य कार्यशाळा घेण्यात आली यावेळी आझाद जमादार यांनी विद्यार्थिनींना मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.

लोकशाही म्हणजे काय? मतदान प्रक्रिया कशी असते, मतदान कशा पद्धतीने केले जाते याबाबत मुख्याध्यापिका समिता गौतम पाटील यांनी माहिती देत सावत्रिक निवडणूक मंत्रिमंडळ कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थिनींच्या निवडी करत जल्लोष साजरा करण्यात आला.

माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत विद्यार्थिनींचे आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. पूजा धानोरकर व मैत्री क्लिनिक यांच्यावतीने मार्गदर्शन करत विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

सांगली महानगरपालिकेच्या वतीने इमारत सुरक्षा अंतर्गत विद्यार्थिनींना आग कशी विझवावे. संकट काळात कसे बाहेर पडावे. याबद्दलची कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

अश्या साप्ताहिक विविध उपक्रमांचे आयोजन करत कार्यक्रम यशस्वी करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका समिता गौतम पाटील यांनी केले.
सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थिनी आदींनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.