प्रतिष्ठा न्यूज

हिंदुत्वाचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपने मला उमेदवारी द्यावी : माजी आमदार नितीन शिंदे* *विधानसभेला हिरवा नाही तर भगवा गुलालच उधळणार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : माजी आमदार नितीन शिंदे यांची प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणावर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हिंदुत्ववादी संघटना सर्व शिवभक्त व हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने माजी आमदार नितीन शिंदे यांचा जाहीर सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे नेते दीपक बाबा शिंदे, प्रसिद्ध उद्योजक मनोहर सारडा, व्यापारी संघटनेचे प्रदीप बोथरा व गायत्री परिवाराचे प्रमुख श्री नरेंद्र भाई जानी उपस्थित होते.

भाजपाचे नेते दीपक बाबा शिंदे, मनोहर सारडा व श्री नरेंद्र भाई जानी यांच्या हस्ते माजी आमदार नितीन शिंदे यांचा प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणावर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दीपक बाबा शिंदे व मनोहर सारडा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या सत्कार समारंभ शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सत्कार समारंभाच्या वेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा बेकायदेशीर दर्ग्याच्या विरोधात आवाज उठवून तो दर्गा सरकारला जमीन दोस्त करायला लावला. आता त्याच पद्धतीने विशाल गडावरील इस्लामिक अतिक्रमण व मुस्लिम सरदार हजरत पीर मलिक ए रेहान च्या नावाने असलेला बेकायदेशीर दर्गा सुद्धा उद्ध्वस्त करायला लावणार. विशाळगडा बरोबरच महाराष्ट्रातील ज्या ज्या किल्ल्यांवर अतिक्रमण झाले आहे ते काढायचे असेल तर विधिमंडळात कट्टर हिंदुत्ववादी विचाराचा शिवभक्त आमदार निवडून गेला पाहिजे. आजच्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी जी मागणी केलेली आहे त्याचा आदर राखून मी पक्षाकडे हिंदुत्ववादी उमेदवार म्हणून मला संधी द्यावी अशी मागणी करतो. विशाळगडसह सर्व गडकिल्ल्यांवरील इस्लामिक अतिक्रमणाविरोधात आवाज उठवण्यासाठी लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा, बेकायदा मशिदींचे दिवसेंदिवस वाढणारी संख्या या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाने मला उमेदवारी द्यावी. लोकसभेला जसा हिरवा गुलाल उधळला, हिरवे झेंडे नाचवले हे जर घडायचे नसेल तर पक्षाने मला उमेदवारी द्यावी. आमदार असताना शालेय पोषण आहार घोटाळा, सिव्हिल हॉस्पिटल जमीन घोटाळा, मिरज शासकीय दूध डेरी जमीन घोटाळा, इंदिरा गृहनिर्माण संस्था घोटाळा, वोनलेस चेस्ट हॉस्पिटल जमीन घोटाळा हे घोटाळे उघडकीस आणले व हाणून पाडले.

यावेळी बोलताना ॲड. स्वाती शिंदे म्हणाले की, राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता विधानसभेमध्ये हिंदूंचे प्रश्न मांडण्यासाठी कट्टर हिंदुत्ववादी व शिवभक्त आमदाराची गरज आहे आणि ती गरज माजी आमदार नितीन शिंदे भरून काढू शकतात.

यावेळी बोलताना मनोहर सारडा म्हणाले की, भाजपाने माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासारख्या कडव्या हिंदुत्ववाद्याला व लोकनेत्याला उमेदवारी दिल्यास त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकतीने उभे राहू.

यावेळी बोलताना मनोज साळुंखे म्हणाले की, माजी आमदार नितीन शिंदे जर आमदार असते तर रखडलेले चिंतामण नगर पुलाचे काम कधीच पूर्ण होऊन व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले नसते. पर्यायी पूल बांधल्याशिवाय नवा पूल बांधण्याची परवानगी दिली नसती.

यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी नरेंद्र भाई जानी शिवाजी पाटील अरुण वाघमोडे शैलेश पवार अविनाश मोहिते यांची भाषणे झाली.

यावेळी युवराज बावडेकर, उर्मिला बेलवलकर, महेंद्र चंडाळे, श्रीकांत शिंदे, पंडितराव बोराडे, रावसाहेब खोजगे, महेश चौगुले, महेश शेळके, राजू रसाळ, स्मिता पवार, दत्ता भोकरे, परशुराम चोरगे, विष्णुपंत पाटील, राजू जाधव, सोमनाथ गोटखिंडे, तानाजी शिंदे, प्रदीप निकम, प्रकाश निकम, सचिन देसाई यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.