प्रतिष्ठा न्यूज

तासगाव व कवठे महांकाळ तालुक्यातील सिंचन योजनांना पाणी कमी पडून देणार नाही..भाजपा विधानसभा प्रमुख प्रभाकर पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : भाजप तासगाव कवठे महांकाळ विधानसभा प्रमुख प्रभाकर पाटील यांनी सांगली पाटबंधारे मंडळ जलसंपदा विभाग येथे बुधवारी भेट दिली.यावेळी तासगाव व कवठे महांकाळ तालुक्यातील सिंचन योजनांची आवर्तने व टंचाईसदृश्य भागांना पाणी देणेसंदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.तासगाव व कवठे महांकाळ तालुक्यातील टेंभु योजनेच्या ढालगाव वितरिका सुरु करणे व वितरिकेच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना पाणी चालु करणे, दुधेभावी तलावामध्ये पाणी पुन्हा सुरु करणे,ताकारी योजनेचे पाणी नदी येरळा नदीपात्रामध्ये सोडून शेवटच्या गावापर्यंत पोहचवुन बंधारे भरुन घेणे तसेच उपळावी गावापर्यंत सर्व ठिकाणी पाणी वितरित करणे, विसापुर – पुणदी योजना लाभ क्षेत्रातील सर्व गावांना पाणी देवुन पुणदी उपसा सिंचन योजनेतून सर्व सावळज परिसरात पाणी पोहोचे पर्यंत विसापूर-पुनदी योजना सुरु ठेवावी यासाठी तारळी व कण्हेर धरणातून आवर्तने सुरु ठेवावीत   म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील गव्हाण योजन सुरु करुन मणेराजुरी, योगेवाडी व सावर्डे या गावांना पाणी द्यावे,अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करुन
पाटबंधारे विभागाकडून यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले,असे प्रभाकर पाटील यांनी सांगितले.या बैठकीस सांगली पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे,कार्यकारी अभियंता सर्वश्री सचिन पवार,हारुगडे,रोहित कारे आदी अधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.