प्रतिष्ठा न्यूज

लव्ह जिहाद च्या जाळ्यात फसणाऱ्या मिरजेतील मुलींची संख्या लक्षणीय; हिंदू पालकांनो सावध व्हा- माजी आमदार नितीन शिंदे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : हिंदु एकता आंदोलन मिरज शहर पदाधिकारी मेळावा आदर्श मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. या मेळाव्यात मिरज शहर हिंदु एकता आंदोलनाची भक्कम बांधणी करणे, काही पदाधिकाऱ्यांची निवड करणे व शाखा उघडणे याविषयी चर्चा करण्यात आली. समान नागरी कायदा या विषयावर राज्यव्यापी लढा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मेळाव्याच्या सुरुवातीस जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी स्वागत व प्रस्तावित केले.

यावेळी बोलता हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, लव्ह जिहादच्या जाळ्यात फसलेल्या मुलींची संख्या लक्षणीय असून हिंदुत्ववादी संघटनांनी फसलेल्या अनेक मुलींना यातून सोडवले आहे. हिंदू पालकांनी सावध होण्याचे आवाहन देखील यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले. भविष्यात लव्ह जिहादच्या जाळ्यात मुली फसू नयेत म्हणून हिंदु एकता आंदोलन लव्ह जिहाद विरोधी कायदा सरकारने करावा यासाठी एक व्यापक लढा उभा करणार आहे.

या मेळाव्यात ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाटील, हिंदु एकताचे जेष्ठ सदस्य दत्तात्रय भोकरे, नंदू गौड, शशिकांत वाघमोडे, परशुराम चोरगे यांची भाषणे झाली.

यावेळी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार नितीन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सोमनाथ गोटखिंडे, मिरज शहराध्यक्ष राहुल जाधव, पांडुरंग लोहार, शशिकांत वाघमोडे, राहुल जाधव, सुभाष केसरे, शिवाजी दुधाळ, प्रकाश भोसले, विजय टोणे, कलगोंडा पडसलगे, राजू जाधव, किशोर झांबरे, कृष्णा नायडू, राजू गवळी, सुरेश शेळके आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.