प्रतिष्ठा न्यूज

जि.प.प्रा.शाळा जाकापूर येथे शिक्षण पर्व ,नाविन्यपूर्ण उपक्रम अध्यापनशास्त्र सत्र उत्साहाने संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/ जिल्हा प्रतिनिधी
नांदेड दि.13 : कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाकापूर येथे नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र उपक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प. केद्र शाळा गोणार चे केंद्र प्रमुख श्री मोरे सी .डी . हे होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून
श्री नरहारे सर (ग.शि.अ. कार्यालय कंधार),
श्री ज्ञानेश्वर गंगाधर जाधव – अध्यक्ष शिक्षण समिती
श्री हानमंत माधवराव जाधव( उपाध्यक्ष) शिक्षण समिती हे उपस्थित होते.
जि.प.प्रा.शाळा.जाकापूर ही शाळा इयत्ता 1 ली ते चौथी पर्यंत असून शाळेची वाटचाल डिजिटल शाळा म्हणून सुरू आहे. सदरील शाळेची स्थापना 1 /11/1961 रोजी करण्यात आली. शाळेचे मु.अ.श्री चाटे तसेच सहशिक्षक श्री सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.विदयार्थ्यांची 100 टक्के उपस्थिती,100%गुणवत्ता,100%मुलांना मोफत शालेय गणवेश ,राष्ट्रीय कार्यक्रम 15 आॅगस्ट,26 जानेवारी,17 सप्टेंबर विद्यार्थ्यांचे भाषण स्पर्धा, विविध शालेय उपक्रमात सहभाग,बाल आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम संगीत लेझीम महोत्सव आयोजित केला जातो. या शाळेतील विद्यार्थी शिक्षण,इंजिनिअर,प्राध्यापक,शिक्षक, आ.टी.आय. या शिक्षणाबरोबरच आता वैद्यकीय शिक्षणात गरुड भरारी घेत आहेत ही गावासाठी,शाळेसाठी आनंदाची बाब आहे. येथील शाळेत तज्ञ शिक्षक असून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिले जाते.
सदरील कार्यक्रमास
प्रमुख उपस्थिती
श्री शेख सर – पदोन्नत मु.अ.नारनाळी
श्री कदम सर- पदोन्नत मु.अ.शिरसी बु
श्री आचमारे सर -मु.अ‌. खंडगाव
श्री शंकरराव संतुकराव पवार – जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री साळूंके डि.बी. यांनी केले .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमूख पाहुणे व मान्यवराच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थी यांनी स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हे स्वागत गीत गायन केले.
या गीतांवर खूश होऊन नारनाळीचे मु.अ.यांनी रोख बक्षीस दिले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी गावचे जेष्ठ नागरिक
श्री शंकरराव संतुकराव पाटील पवार यांचा सत्कार श्री मोरे सर यांनी केला. तसेच
श्री मोरे सर यांचा सत्कार अध्यक्ष ज्ञानेश्वर गंगाधर जाधव यांनी केला. तर
श्री नरहारे सर यांचा सत्कार उपाध्यक्ष हानमंत जाधव यांनी केला.
यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत नारनाळी शाळेचा पहिला क्रमांक आला. त्याबद्दल शाळेचे मुअ.यांचा सत्कार करण्यात आला ‌
कार्यक्रमाचे प्रास्ताविक –
श्री चाटे सी आर मु.अ.जाकापूर यांनी शाळेतील उपक्रम गुणवत्ता व शाळेचे पुढील उद्दिष्ट्ये याबाबत सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी मनोगत- श्री ज्ञानेश्वर गंगाधर जाधव यांनी केले.
आदर्श पाठाचे सादरीकरण
श्री साळूंके सर यांनी भाषा गणित इंग्रजी विषयांचा पाठ घेतला.
कार्यक्रमाचे निमित्त माहिती व सुचना – श्री मोरे सी डी केंद्र प्रमुख यांनी दिल्या.
या कार्यक्रमाला गोणार केंद्रातील अंतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक सहशिक्षिका शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री पवार एन एस सर ,श्री संभाजी मारोती पवार श्री गणपत जाधव श्री गंगाधर जाधव श्री देविदास जाधव श्री उध्दव शिरसे श्री हानमंत शिरसे श्री फौजी पा. जाधव, श्रीमती हारूबाई पवार, श्रीमती भारतबाई वाघमारे,श्रीमती चवूतराबाई वाघमारे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे आभार शिक्षण समिती उपाध्यक्ष
श्री हानमंत माधवराव जाधव यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.