प्रतिष्ठा न्यूज

कंधार पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी बालाजी शिंदे रुजू- शिक्षण क्षेत्रात आनंदी वातावरण

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
नांदेड : नांदेड जिल्हा शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेले व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील असणारे बालाजी गोविंदराव शिंदे यांना दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी कंधार पंचायत समितीचे नवे गटशिक्षणाधिकारी म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे.
बालाजी शिंदे हे कंधार तालुक्यातील शिराढोण येथील रहिवासी असून अत्यंत हुशार असल्यामुळे त्यांना शिक्षण क्षेत्रातील संपुर्ण बारकावे माहीत आहेत. प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत असतांना त्यांनी 2008 मध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांची नांदेड शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नेमणुक झाली.
तेंव्हा पासुन त्यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी मा.डॉ.श्रीकर परदेशी साहेबांनी त्यांच्या कल्पनेतील जिल्ह्यात शैक्षणिक बदल घडविण्यासाठी त्यांना सहकारी म्हणून सोबत घेतले होते. त्यावेळी त्यांनी कॉपीमुक्त मोहिमेत चांगले काम केले होते.
बालाजी शिंदे यापूर्वी नांदेड पंचायत समिती अंतर्गत चौफाळा बीट 3 मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून उत्तम कार्य केले आहे. त्यानंतर त्यांनी मुखेड, हिमायतनगर या तालुक्यामध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे.
त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक
सौ. वर्षाताई ठाकूर यांनी त्यांची जन्मभूमी असलेल्या कंधार तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी दिली आहे.
त्यांचा या नेमणुकी बद्दल तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नक्की परिवर्तन होईल यात शंका नसून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.