प्रतिष्ठा न्यूज

खाडे स्कूलच्या ऐतिहासिक प्रदर्शनाला मिरज परिसरात उदंड प्रतिसाद….

प्रतिष्ठा न्यूज /योगेश रोकडे
मिरज: दास बहूउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज येथे ऐतिहासिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले प्रतिकृती, त्यांचा राज्यभिषेक, अश्मयुगीन मानवी जीवन व त्यांची उत्क्रांती, जुनी खाद्यसंस्कृती, संत गोरा कुंभार व त्यांची विठ्ठल भक्ती, संत तुकारामांच्या गाथा पाण्यात बुडवल्या तो प्रसंग, वारकरी संप्रदाय,  द्रोणाचार्य गुरुकुल शिक्षण पद्धतीचे दर्शन, एकलव्य याचे गुरुप्रेम व भक्ती, ऋषीमुनी जनजीवन यांची दिनचर्या व वेदाभ्यास, महात्मा गांधी मीठ सत्यागृह, नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना व स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले सर्व राष्ट्रीय नेते, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना संविधान देतानाच प्रसंग,  ऐतिहासिक वास्तू व वस्तू यांचा समावेश होता. त्याचबरोबर संगणकाचा संपूर्ण इतिहास अत्यंत सुदंर प्रतिकृतींच्या साहाय्याने दाखवण्यात आला.  हा शालेय उपक्रम नाविण्यपूर्ण व कौतुकास्पद असल्याने प्रमुख पाहुणे, मान्यवर व पालकांनी या प्रदर्शनाचे तोंडभरून कौतुक केले.
           या ऐतिहासिक प्रदर्शनात भारतीय इतिहास, संस्कृती, तंत्रज्ञान यांचा मेळ घालून जीवंत देखावे व कलाकृतीचे मुलांनी खुप छान सादरीकरण केले आहे. या डोळे दिपवणाऱ्या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी,  मुलांचे कौतुक करण्यासाठी व पाठीवर शाबासकीची  थाप देण्यासाठी दैनिक लोकमतचे सांगलीचे आवृत्ती प्रमुख हनमंत पाटील, नाट्यकर्मी राजेंद्र पोळ, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
       तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, स्वाती खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने मुख्याध्यापिका संगीता पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अत्यंत सुंदर व शिस्तबध्द ऐतिहासिक वातावरणात प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाची चर्चा अरोग्य पंढरीत होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.