प्रतिष्ठा न्यूज

शेअर मार्केटिंग गुंतवणूकीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या बोगस कंपन्यांचा महाघोटाळा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मार्फत छत्रपती उदयन महाराज भोसले यांच्या निदर्शनास

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शेअर मार्केटिंग गुंतवणूकीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या बोगस कंपन्यांच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मार्फत मोठे आंदोलन गेल्या अनेक महिन्यापासून राज्यात सुरू आहे. या कंपण्यानी हजारो कोटीचा घोटाळा महाराष्ट्रात केलेला आहे.
यासंदर्भात वेळोवेळी आम्ही प्रशासनाकडे या कंपनीज विरोधात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तसेच काही कंपन्यांच्या संचालकांना  अटकसुद्धा झालेली आहे.
याबाबत आज माजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले यांची जलमंदिर पॅलेस, सातारा येथे भेट घेऊन  महाराजांच्या निदर्शनास हा घोटाळा आणला.त्यांना याबाबत सर्व माहिती दिली.*
*महाराजांनी याची तात्काळ दखल घेऊन अशा बोगस कंपण्याविरोधात कारवाई करण्यासाठी महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री  देवेंद्रजी फडणवीस  यांच्यासाठी स्वतः पत्र दिले व प्रत्यक्ष सुद्धा देवेंद्रजी ना भेटून या संदर्भात कारवाईची मागणी करणार असे आश्वासन यावेळी दिले.*
तसेच, *जनतेचा  लुबाडलेला पैसा जनतेस परत मिळवून देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ला लागेल ते सहकार्य करू असा शब्द महाराजांनी यावेळी दिला.*
यावेळी अनिल सरगर, सागर सरगर, विनायक खेडेकर,अनिल जाधव, विजय जाधव गोटखिंडी चे सहकारी पै. विशाल पाटील व सर्व युवा सहकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.