प्रतिष्ठा न्यूज

‘व्हाईस ऑफ मिडीया’ पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन मोहिते

प्रतिष्ठा न्यूज
सांगली / प्रतिनिधी : पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगिण विकासासाठी स्थापन झालेल्या देशपातळीवर ‘व्हाईस ऑफ मिडीया’ या पत्रकार संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सचिन मोहिते यांची निवड झाली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक संदिप काळे यांच्या मागदर्शनाखाली पश्चीम महाराष्ट्र अध्यक्ष अभयकुमार देशमुख यांनी मोहिते यांची निवड केली.

सचिन मोहिते हे गेली २० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांनी महाराज्य राज्य मराठी पत्रकार संघटनचे सांगली शहर अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम केले आहे. विविध सामाजीक संस्थांमध्येही ते कार्यरत आहेत. ‘ व्हाइस ऑफ मिडीया’ ही पत्रकार संघटना राज्यातील ५० जेष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी स्थापन केलेली संघटना आहे. देशातील १७ राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे. मूल्याधारित पत्रकारिता ही विचारधारा कायम रहावी. ज्या पत्रकारांच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो ती पत्रकारिता शाबूत रहावी, सुरक्षित रहावी यासाठी संघटना काम करणार आहे. पत्रकारांचे हक्क आणि विकास या व्यापक विचाराने व्हाईस ऑफ मिडीया या संघटनेची स्थापना झाली आहे. लवकरच जिल्हा व तालुका कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी सांगीतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.