प्रतिष्ठा न्यूज

शेअर मार्केटच्या नावावर लुटमार करणाऱ्या मल्टीट्रेड कंपन्यावर तात्काळ पायबंद यासह विविध मागण्यांसाठी मनसेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : खोटी अमिषे दाखवून शेअर मार्केटच्या नावावर लुटमार करणाऱ्या मल्टीट्रेड कंपन्यावर तात्काळ पायबंद घालण्यात यावा व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मनसेचे सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, भारत सरकारने २०१४ साली कलेक्टीव्ह इनव्हेस्टमेंट स्कीम (CIS) हा कायदा अमलात आणला व या कायद्या अंतर्गत २०१४ साली देशातील हजारो कंपन्या बंद करण्यात आल्या ज्या आर. बी. आय. च्या अखत्यारीत नव्हत्या. परंतु सध्या त्याच प्रकारे रजिस्टर ऑफ कंपनी (ROC) व लिमिटेड लॅबिलीटी पार्टनरशीप (LLP) कंपनी कायद्या अंतर्गत कंपन्या नोंदीत करुन शेअर मार्केटच्या नावाखाली खोटी अमिषे दाखवून, त्याकरीता वेगवेगळे फंडे वापरुन अनेक लोक गल्ली बोळात दुकाने घालून वसलेले आहेत. ते लोक स्वतः ब्रोकर आहेत का? व जे इन्वेस्टर आहेत त्यांना त्यांचे डीमॅट अकौंट काढून दिले आहे का? ज्यादा परताव्याचे अमिष दाखवून अशा कंपनीमध्ये पार्टनर करुन घेतलेल्या लोकांना त्या व्यवसाय बाबतची संपुर्ण माहिती दिली आहे किंवा त्यांच्याशी कायदेशीर करारपत्र केले आहे का? नसेल तर कोणत्या कायद्या अंतर्गत मल्टीट्रेड कंपन्यांचे संचालक सर्व सामान्य लोकांकडून पैसा गोळा करत आहेत. यांचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.

सध्या सांगली जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य लोकांना अशा कंपन्यांनी लुटलेले आहे. हजारो कोटी रुपयांचा गंडा घातलेला आहे. दररोज या विषयी वर्तमानपत्रात बातम्या छापून येत आहेत. परंतु शासन, प्रशासन जबाबदार लोकप्रतिनिधी यावर काहीही भाष्य अथवा कारवाई करताना दिसत नाहीत. आकर्षक लाईफ स्टाईल, परदेशी टुर्स, हॉटेल मेजवाणी, कमी वेळात दामदुप्पट पैसा करणे, असे वेगवेगळे फंडे वापरुन शेअर मार्केटच्या नांवावर गुंतवणूकदारांचे कोणतेही डीमॅट अकौंट न काढता अथवा बिझनेस पार्टनर म्हणून विझनेसची माहिती, कायदेशीर करारपत्र यापासून लोकांना अज्ञान ठेवून सदरच्या कंपन्यांनी जिल्ह्यातील हजारो कोटी रुपये सर्व सामान्य जनतेकडून लुटलेले आहेत. या लोकांनी आपली जन्मभराची जमापुंजी या कंपन्यांमध्ये गुंतवलेल्या आहेत. यातील काही कंपन्या आपला बोऱ्या विस्तरा गुंडाळून करोडो रुपये गोळा करुन पसार झालेल्या आहेत. तर काही कंपन्यांकडून अजूनही राजरोसपणे लोकांना लुटण्याचा धंदा चालू आहे. या विषयी आम्ही यापुर्वीच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक सो यांच्याशी पत्रव्यवहार करुन कारवाईची मागणी केली होती. परंतु आजअखेर यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही. परिणामी आज जिल्ह्यातील हजारो लोक देशोधडीला लागलेले आहेत व लागणार आहेत. काही लोकांनी आपले घरदार,ं जमीनजुमला विकून असेल तेवढी मालमत्ता या कंपन्यामध्ये गुंतवलेले आहे. आज त्या लोकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी उफाळणार आहे. यास जबाबदार कोण? एस. एम. ग्लोबल व वेफा मल्टीट्रेड या कंपन्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र त्यांनी एकूण किती पैसा लोकांकडून गोळा केला व तो कोठे लपविला याचा तपास लागलेला नाही. लोकांचे हजारो कोटी रुपये कुठे व कसे गेले याचा तपास लागत नाही. यासाठी स्वतंत्र तपास यंत्रणा नियुक्त करणे गरजेचे आहे. असे केल्याने या कंपन्याचे संचालक, एजंट यांचा योग्य तपास होईल व हा ब्लॅक मनी कोठे व कसा गुंतवला आहे याचा तपास लागेल व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यास मदत होईल.
अशा बोगस कंपन्या स्थापन करुन लोकांचा पैसा गोळा करणाऱ्या कंपन्यांवर संघटीत गुन्हे कायदे अंतर्गत (मोका) कारवाई केल्यास यापुढे ठग लोक अशा कंपन्या पुन्हा काढून लोकांची राजरोसपणे लुटमार करणेचे धाडस करणार नाहीत. तसेच अशा कंपन्यांना शेअर मार्केटचे बनावट सॉप्टवेअर बनवून देणाऱ्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. तरी सदर बाब गांर्भीयाने घेवून जिल्ह्यातील अन्य ठिकाणी असलेल्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी ही विनंती व काही बंद असलेल्या कंपन्यांवरही चौकशी करुन गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी कोणतीही तक्रारीची वाट पाहू नये. काही कंपन्यांची नांवे खालीलप्रमाणे

पिनॉमिक मल्टीट्रेड अॅन्ड डेव्हलपर्स सांगली, सी.एस. प्रा.लि. सांगली, गीगा ब्लॉक कॉईन (क्रिप्टो करन्सी) सांगली मालक विपुल पाटील, पंकज पाटील, कॅप्रिच सिध्दीविनायक फोरम, झेड.पी. ऑफिस समोर, सांगली रिचाधर स्वदेशी हाईटस् ३ रा मजला, विजयनगर चौक, सांगली एस. एम. एल. ग्लोबल सांगली मालक मिलींद गाडवे, सांगली रेहान मल्टीट्रेड सांगली मालक :महादेव पाटील, पुणे अमेज लाईन प्रा. लि. मालक सागर खाडे, पुणे

ए. एस. ट्रेडर्स मालक : रोहीया, कोल्हापूर

B जी. डी. सी. कॉईन ग्लोबल डिजीटल कॅश I मालक : इरान सैय्यद

डॉक्सी कॉईन, ब्लॅक ऑरा कॉईन मालक इरान सैय्यद

. दुर दृष्टी व्हेन्युटीज इंडीया प्रा.लि.

” . शुभ ट्रेडब्रेटवेल ट्रेडर्स अॅन्ड डेव्हलपर्स शाखा, चांदणी चौक, सांगली, मालक: अमित रमेश भंडारे, कोल्हापूर

तसेच जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. त्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी ही विनंती.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.