प्रतिष्ठा न्यूज

परमपूज्य गुरुमाऊलींच्या अभिष्टचिंतन निमित्त तासगावात शनिवारी महाआरोग्य तपासणी आणि महारक्तदान शिबीर…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्रासह सांगली जिल्ह्यातील सर्व केंद्राच्या वतीने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व अष्टसिद्धी महाशक्तीपिठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली श्री.अण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून महाआरोग्य तपासणी व महारक्तदान शिबीर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग गेल्या सातदशकापासून बालसंस्कार, कृषीशास्त्र,आरोग्य व आयुर्वेद विभाग, मराठी अस्मिता व मराठी संस्कृती, मानवी समस्या -विवाह,नोकरी, कोर्ट कचेरी व अनेक मानवी जीवनातील समस्या याविषयी मार्गदर्शन आणि आध्यत्मिक सेवा उपाय, वास्तूशास्त्र, विवाह संस्कार,युवा प्रबोधन,गर्भ संस्कार व पालकत्व आदी विभागाच्या माध्यमातून कार्यरत आहे.
धर्म,देश,प्रांत,सीमा या भेदाच्यांही पलीकडे उद्बोधन करणारे व २०% आध्यात्मिक आणि ८०% सामाजिक उपक्रमाचे ग्रामअभियानातून भारतीय संस्कृती जपून राष्ट्रीय विकासाची  वृध्दी करणारे व विश्वकल्याणात्मक  संस्कार रुजविण्यासाठीचे महत्कार्य प. पू. गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. याच अनुषंगाने परमपूज्य गुरुमाऊलीच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक *५ मार्च ते १९ मार्च* या कालावधीत संपूर्ण देशात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,त्र्यंबकेश्वरचे प्रशासकीय प्रमुख आदरणीय श्री.चंद्रकांत(दादा) मोरे यांच्या मार्गदर्शना खाली संस्कार पंधरवडा जनसेवा अभियानांतर्गत विविध अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
परमपूज्य गुरुमाऊली यांच्या अभिष्टचिंतन निमित्त शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत विनामूल्य महारक्तदान शिबीर,नेत्रतपासणी,दंत तपासणी व रक्त तपासणी संपन्न होणार आहेत.
हा कार्यक्रम दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न होण्यासाठी सर्व सेवेकरी प्रयत्न करीत आहेत.तरी परमपूज्य गुरुमाऊलीच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने संपन्न होणाऱ्या सामाजिक व अध्यात्मिक उपक्रमांत सर्व स्वामी भक्तांनी सहभागी होऊन सुखकर व्हावे..
शिबिराचे ठिकाण :- श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र त्रिमूर्ती कॉलनी माळी गल्ली तासगाव.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.