प्रतिष्ठा न्यूज

जागतिक मत्स्य दिनानिमित्त ‘कर्मवीर’मध्ये मत्स्य पदार्थांचे प्रदर्शन संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर (प्रतिनिधी) : “उत्तम आरोग्यासाठी प्रथिनांची गरज असते. मास्यांच्या मांसामध्ये मोठ्या प्रमाणावर
प्रथिने असतात. माझ्यापासून येणारा उग्र वास व त्यामधील काटे या दोन कारणांमुळे अनेक लोक आपल्या दैनंदिन आहारामध्ये मासे खात नाहीत. परंतु चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या रोजच्या आहारामध्ये मासे असणे गरजेचे असते. पारंपरिक स्वरुपात मास्यांचे सेवन आमटी व फ्राय यापेक्षाही मास्यांपासून बनविलेले व आपल्याकडे फारसे प्रचलित नसलेले हे सर्व पदार्थ हे वासरहित असल्याने खवय्यासाठी निश्चितपणे मेजवानी ठरणार आहे. या पदार्थाच्या मदतीने काही विद्यार्थी व्यवसाय सुद्धा करू शकतात.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाकडून ‘खाद्य संस्कृती जपूया, आरोग्य निरोगी ठेवूया’ या उद्दिष्टावर आधारित जागतिक मत्स्य दिनाच्या निमित्ताने, ‘मत्स्य पदार्थांचे प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये माश्यांपासून बनविलेले विविध पदार्थ मांडण्यात आले होते. सर्व पदार्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविले होते. यामध्ये मत्स्यवडा, फिश कटलेट, मत्स्य चकली, मत्स्य शेव, मत्स्य पराठा, मत्स्य पॅटीस या पदार्थांचा समावेश होता. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रदर्शनाला महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेटी दिल्या.
अनेकांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, डॉ. बजरंग शितोळे, डॉ. बाळासाहेब बळवंत, डॉ. समाधान माने, डॉ. चंद्रकांत काळे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. अमर कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समृध्दी सावंजी यांनी केले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्राणीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अमोल ममलय्या, श्री. अक्षय माने, श्री. प्रदीप गायकवाड, कु. श्वेता तेली, कु. हर्षदा चव्हाण, कु. दिव्या गायकवाड, कु. कविता कुलकर्णी, राजू निंबाळकर, पांडुरंग गुंड यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार विपुल गोसावी यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.