प्रतिष्ठा न्यूज

तासगावात पोलिसांच्या पेट्रोलिंगमुळे रंगपंचमीला हुल्लडबाजाना चाप…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:तासगाव शहर आणि तालुक्यात पोलिसांच्या वतीने रंगपंचमीच्या निमित्ताने मोठा बंदोबस्त तैनात  करण्यात आला होता.यावेळी शहरात सुरू असणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोलिंग मुळे हुल्लड बाजाना चाप लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. रंगपंचमीच्या दिवशी रंग टाकण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून मोठे भांडण होण्याचे प्रकार तासगाव शहरात यापूर्वी घडलेले आहेत.तसेच हुलडबाज तरुणांच्या मोटरसायकल वरून फिरून  नागरिकांना त्रास देण्याचे घटनाहि घडलेल्या आहेत.या पार्श्वभूमीवर रविवारी रंगपंचमीच्या दिवशी सकाळपासूनच तासगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त शहरात ठेवला होता.ट्रिपल सीट फिरणाऱ्या तरुणांच्या मोटरसायकली पोलिसांनी काढून घेतल्या व त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली,त्याचबरोबर गटागटांनी फिरून दंगा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी समज दिली. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचें तासगावचे नागरिकांनी स्वागत केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.