प्रतिष्ठा न्यूज

सावळज येथे शालेय विद्यार्थ्यांनीचा सर्पदंशाने मृत्यू

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज : सावळज ता. तासगाव येथील कु.प्रांजल प्रमोद माळी वय (8) या शाळकरी मुलीचा काल (मंगळवार) दिनांक २२ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झोपेतच विषारी सापाने दंश केल्यामुळे मृत्यू झाला होता. सर्पदंशानंतर प्रांजलला उपचारासाठी सावळज येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते परंतू प्रांजल ची प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यास डॉक्टरांनी सांगितले दरम्यान उपचारापूर्वीच प्रांजलची प्राणज्योत मालवली. सावळज येथील एस. के. उनउने इंग्लिश मेडिअम स्कुल मध्ये इयत्ता 3 री च्या वर्गात शिकणाऱ्या प्रांजलच्या मृत्यूची बातमी सावळज मध्ये वाऱ्यासारखी पसरली. तिच्या मृत्यूमुळे सावळज गाव शोकाकुल झाले आहे. अतिशय कमी वयात तिचा सर्पदंशाने झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी असल्याच्या भावना व्यक्त गावकरी करीत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.