प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा परिसरात अतिवृष्टी ; वादळी वारे व पाऊस यामुळे दहा घरांची पडझड

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा ता. २७ : आज सकाळी संपलेले चोवीस तासात नऊ घरे व एक गोठा यांच्या भिंती पडून जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले. आज अखेर तालुक्यात ४३ घरे व सात गोठे यांच्या भिंती पडून, पत्रे उडून, घरावर झाडे कोसळून पंधरा लाखाचे वर हानी झाली आहे.
कोदे धरण परिसरात काल १७३ मि. मी. पावसाची नोंद झाली असून एक जून पासून आज अखेर ३८५६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
काल बावेली दोन, धुंदवडे दोन, व शेळोशी, कातळी, खडूळे, सैतवडे, मुटकेश्वर,खेरिवडे येथे प्रत्येकी एका घराचा समावेश आहे.
* केवळ नशीब बलवत्तर *
सैतवडे पैकी रेव्याची वाडी येथे कृष्णा मारुती वरेकर यांच्या राहत्या घराची भिंत जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे काल पहाटेच्या सुमारास पडली. वरेकर कुटुंबीय नेमके दोन दिवसांपूर्वीच पाहुण्यांच्या कडे गेले होते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत.
सलग सहाव्या कोल्हापूर गगनबावडा महामार्ग रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.