प्रतिष्ठा न्यूज

सावळज येथे अपंग सेवाभावी संस्था व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज : सावळज येथे अपंग सेवाभावी संस्था व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 3 डिसेंबर जागतिक अपंग (दिव्यांग) दिन मोठ्या उत्साहात साजरा
सावळज ता. तासगाव येथे 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग (दिव्यांग) दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन अपंग सेवाभावी संस्था व प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुल कलाल यांनी केले होते या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले तर दिव्यांग बांधवांना फळांच्या झाडाची रोपे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच माजी सैनिक व वीर पत्नी,यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने अपंग सेवा भावी संस्थेच्या वतीने संजय गांधी निराधार योजने अंतर्गत एकूण 13 लाभार्थी विधवा महिलांना पेन्शन मंजुरी पत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन अपंग (दिव्यांग) सेवाभावी संस्था व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष श्री राहूल कलाल यांनी केले.
या वेळी मा. उपसरपंच संजय तात्या थोरात, विवेक सावंत, संदीप पाटील, संजय वांडरे, सुनील कांबळे, शिवाजी शिंदे, श्रीकांत शिंदे, वीरपत्नी बनुताई जाधव, नागेश सुतार, माजी सैनिक आप्पासाहेब निकम, सुधाकर पोळ, रावसाहेब शिंदे, मधुकर निकम, संभाजी माळी, अविनाश हंकारे, डॉ. निशिकांत सूर्यवंशी,व मान्यवर मंडळी तसेच दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.