प्रतिष्ठा न्यूज

एम.टी.ई.एस. इंग्लिश स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित एम.टी.ई.एस. इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुण्या म्हणून मंजिरी सुधीर गाडगीळ ( आमदार सुधीर गाडगीळ  यांच्या सुविद्य पत्नी ) लाभल्या. तसेच या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज (बाबा) देशमुख, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर, सचिव सुरेंद्र चौगुले, व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
      कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व दीपप्रज्वलनाने झाली. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्या अंजना कोळी यांनी केला. पाहुण्यांचा सत्कार पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन केला. सर्व मान्यवरांच्या हस्ते संस्थेची डायरी व कॅलेंडर यांचे प्रकाशन करण्यात आले. प्रशालेच्या वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्या इंदिरा पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्या मंजिरी सुधीर गाङगीळ व आपल्या संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले.
      आपले आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या स्नेहसंमेलनात पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक नृत्य प्रकार आहेत. या नृत्यांची ओळख विद्यार्थ्यांनी रामायण, महाभारत ,कृष्ण लीला ,बीहू ,दक्षिण भारतीय ,पंजाबी , राजस्थानी, महाराष्ट्रीयन, देशभक्तीपर, पंचमहाभूत , शेतकऱ्यांची व्यथा या सर्व नृत्य प्रकारांमधून करून दिली. या स्नेहसंमेलनाचे रामायण, महाभारत ,कृष्ण लीला, आर्मी नृत्य हे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. या  स्नेहसंमेलनासाठी संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज (बाबा) देशमुख, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर , सचिव श्री. सुरेंद्र चौगुले, सर्व अधिकारी, पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी स्नेहसंमेलनाचा मनमुराद आनंद घेतला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.