प्रतिष्ठा न्यूज

कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त सायकल रॅली उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
इचलकरंजी प्रतिनिधी : येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा कन्या महाविद्यालय इचलकरंजी, अखिल भारतीय मारवाड़ी युवा मंच आणि मारवाड़ी युवा मंच मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी *राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त* आरोग्य जनजागृती अभियानाअंतर्गत Cyclothon 4.0 चे आयोजन करण्यात आले.

यावेळी इचलकरंजी शहरातील शाहू पुतळा-शिवतीर्थ-गांधी पुतळा या परिसरामध्ये सायकल रॅली काढण्यात आली.

सायकलिंगचे शारीरिक आरोग्यासाठी भरपूर फायदे होतात .सायकलची ओळख ही १९ व्या शतकात झाली. १८८0 मध्ये रॉयल मेलया ब्रिटिश माणसाने पहिली सायकल चालवण्यास सुरुवात केली. इतर खेळांसारखा हा ही एक खेळ प्रकार आहे, ज्यात जास्त कौशल्यची गरज नाही. शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते,आजार कमी होण्यास मदत होते. सायकलींवर मोटार वाहनांच्या तुलनेत असंख्य फायदे आहेत, ज्यामध्ये सायकल चालवणे, सोपे पार्किंग, वाढत्या गतिमानता आणि रस्ते, बाईक पथ आणि ग्रामीण पायऱ्यावरील प्रवेश यांचा समावेश आहे.

सायकलिंगमुळे जीवाश्म इंधन, कमी हवा किंवा ध्वनी प्रदूषण कमी होते, आणि रहदारीच्या जास्तीत जास्त घट कमी होते. यामुळे कमीत कमी वापरकर्त्यास तसेच सोसायटीला कमी आर्थिक खर्च येतो
(रस्त्यांची नगण्यपूर्ण हानी,कमी रस्ते आवश्यक क्षेत्र).

१९ व्या शतकात सायकलींची सुरुवात झाली आणि आता जगभरात सुमारे १ अब्जांची संख्या आहे.ते जगातील बऱ्याच भागांमध्ये वाहतुकीचे मुख्य साधन आहेत.
त्यामुळे सध्या सायकलिंग हे माणसाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे साधन मानले जात आहे.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब दुधाळे, प्रो.डॉ.त्रिशला कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी श्री रामकिशोर जी वर्मा, द्वारकाधीश चांडक, पंकज भंडारी, पूनम बाल्दी, उषा दरक, ममता धूत, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा सोमनाथ गायकवाड, क्रिडा विभागप्रमुख डॉ सविता भासले, प्रा संदीप पाटील, प्रा प्रिया सुतार आणि प्रा निकिता बडे,तानाजी भारती आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील क्रिडा विभागाने केले व सूत्रसंचालन प्रा संदीप पाटील यांनी केले. आभार क्रीडा विभाग प्रमुख डॉ सविता भोसले यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.