प्रतिष्ठा न्यूज

कापशी येथील श्री भगवान त्रिकुटेश्वर मंदिरातील दान पेटीची चोरी

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :- लोहा तालुक्यातील कापसी बु.येथील भगवान त्रिकुटेश्वर महादेव मंदीरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि.6 मार्च 2024 रोजी घडली आहे.
कापसी येथे पुरातन हेमाडपंथी भगवान त्रिकुटेश्वर महादेव मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी विविध कार्यक्रमाची होत असतात मात्र 6 मार्च रोजी मध्यरात्री चोरट्यांनी दानपेटी घेऊन पोबारा केला. नित्य नियमाप्रमाणे मंदिरातील पुजारी भगीणी अंजनगिरी या पुजेसाठी मंदीरात आल्या असता मंदीरातील दानपेटीच गायब झाल्याचे दिसून आले. त्यांनी ही घटना गावकऱ्यांना कळवली. सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी उस्माननगर पोलिसांना कळविली. मंदीरातील दानपेटी ही नंदीच्या शेजारी ठेवण्यात आली होती. सदर दानपेटी ही मंदीराचे लगतच पाठीमागे असलेल्या नदीत नेऊन दानपेटीला फोडून त्यातील पैसे चोरट्यांनी चोरुन नेले व पेटी तेथेच टाकून चोरटे पसार झाले. यापूर्वीही श्री भगवान त्रिकुटेश्वराची पंचधातूची प्राचीन मूर्ती चोरीस गेली होती. चोरी घटनेची माहिती मिळताच उस्माननगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रभू केंद्रे, पोलिस उपनिरीक्षक गजानान गाडेकर, बीट जमादार श्रीमंगले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.