प्रतिष्ठा न्यूज

निघाली पावले सांगलीतून मुंबईला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीतून शहीद अशोक कामटे स्मुर्ति फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी शहीद दौडचे आयोजन केले जाते. यावर्षी ही दौड सांगलीतील शहीद कामटे चौकातून मशाल व तिरंगा ध्वज घेवून आज सोमवार २०/११/२०२३ रोजी सकाळी तसागाव, विटा मार्गे कराड, सातारा, पुणे, खोपोली, पनवेल, माटुंगा मार्गे गेट वे ऑफ इंडिया येथे २६/११/२०२३ रोजी सकाळी ०७:०० वाजता पोहचणार आहे. शहिदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी ही देशातील एकमेव दौड आहे. या दौड ची सुरुवात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा मिरज विभाग, चितळे डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक शशिकांत कुलकर्णी, शहीद फाऊंडेशन चे अध्यक्ष समित दादा कदम यांनी झेंडा उंचावून झाली.
        या ४७० किमी दौडमध्ये शहीद मॅरेथॉनचे ३० खेळाडू सहभागी झाले आहेत. तर  या मुंबईपर्यंत धावत जाणाऱ्या अल्ट्रा रनर्सना प्रोत्साहन देण्यासाठी सांगलीतील विविध संस्था, मंडळे व खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्याबरोबर ५ किमीची लोकल दौड धावून प्रोत्साहन दिले. आयोजित शहीद दौडीत शेकडो सांगलीकरांनी धाव घेत एकीचे दर्शन घडविले. २६/११ शहीद दौड मध्ये फाऊंडेशनचे पुढील खेळाडू धावणार आहेत.१) स्वप्नील माने, २) आदित्य लोखंडे, ३) जयदिप घार्गे,४) प्रतिक नलवडे, ५) वैभव आटुगडे, ६) सेहवाग गोसावी, ७) प्रितम सुतार,८) एकलव्य हाबळे, ९) संग्राम शिंदे, १०) आदित्य पवार,११) राज मोरे, १२) आदिनाथ यादव, १३) विश्वनाथ सुर्यवंशी, १४) इरफान जमादार, १५) आदर्श सपकाळ,१६) निशांत जाधव, १७) हुसेन जमादार, १८) किशोर देसाई, १९) चंद्रकांत निवर्गी, २०) अजय मोरे, २१) शितल पाटील, २२) आकाश मोरे, २३) सर्वजित पाटील, २४) पार्थ अष्टेकर, २५) चैतन्य कदम, २६) अक्षय पाटील, २७) मयुर लोंढे, २८) रोहीत लांडगे,२९) प्रमोद लोंढे
              रविवार २६ नोव्हेंबर २०२३ रोजी या दौडीची सांगता गृहमंत्री,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहिदांना अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहे.
           तरी  “शहीद दौड” च्या आयोजन कामी द शहीद दौड-२०२३ टिम व फाऊंडेशनचे अध्यक्ष समित कदम, फाऊंडेशनचे सचिव ईनायत तेरदाळकर, घनःशाम उके शहीद मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर डॉ चंद्रशेखर हळींगळी, समन्वयक योगेश रोकडे, देवदास चव्हाण, पै. अभिजीत पाटील, संतोष जाधव, निलेश मिसाळ, अभिजीत भोईटे, ललीत छाजड, सचिन खोंद्रे, नाना शिंदे, पृथ्वी घाटगे, जयश्री शेलार,  नजीर मुजावर, प्रदिप सुतार, विरेन हळिंगळे, दिपक पाटील, पुषण चिकली, सुधिर भगत, उमेश गुड्डी, अजित दुधाळ, अमित सोणावणे, विनायक कवडे, हिना पठाण, राहूल लोखंडे  हे परिश्रम घेत आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.