प्रतिष्ठा न्यूज

लोकशाहीर दिलीप झेंडे यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कवलापूर ( ता. मिरज ) येथील लोकशाहीर दिलीप परशुराम झेंडे ( वय-७०) यांचे मंगळवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.स्वातंत्र्य सैनिक कै. पी. बी. झेंडे यांचा मुलगा तर प्रदीप उर्फ नाना झेंडे यांचे ते थोरले बंधू होत.
महाराष्ट्र लोककला दर्शन च्या माध्यमातून “भारूड” ही लोककला महाराष्ट्र , दिल्ली , राजस्थान , गुजरात , बिहारसह अनेक राज्यात पोहचविण्याचं काम दिलीप झेंडे यांनी केलं. काळू -बाळू , विठाबाई नारायणगावकर, मंगला बनसोडे, प्यारन कराडकर या आघाडीच्या लोकनाट्य मंडळासह अनेक लोकनाट्य मंडळात तसेच ऑर्केस्ट्रा मधून त्यांनी आपल्या विनोदी भूमिकेतून वेगळी छाप टाकली होती. सांगलीत झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात त्यांनी सादर केलेल्या भारूडाने उपस्थितांची मने जिंकली होती. शाहिरी कलेतून शासकीय योजना गावपातळीवर पोहचविण्याचं काम त्यांनी केले आहे.”अभिनयाचे चौफेर झेंडे” रोवणारा हा हरहुन्नरी कलाकार मंगळवार दि.३० मे रोजी काळाच्या पडद्याआड गेला. रक्षाविसर्जन गुरुवार दि.१ जून रोजी सकाळी ९:३० वाजता कवलापूर येथे होणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.