प्रतिष्ठा न्यूज

सोमय्या आणि मणिपूर घटनेचा तासगाव महिला राष्ट्रवादी कडून निषेध..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: मणिपूर येथे घडलेल्या अमानवी राक्षसी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने देशाची जगभरात नाचक्की झाली असून, महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात तसेच भाजपाचें माजी खास.किरीट सोमय्य्या यांच्या अश्लील लांछनास्पद ३५व्हीडीओ क्लीपची चौकशी होऊन जे दोषी आढळतील त्यांच्या वर गुन्हे नोंद करून त्यांना कडक शासन व्हावे,या सर्व महिलांच्या भावना सरकारला कळविणेसाठी तासगाव शहर व तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष महीला विभागाच्या अध्यक्षा नलीनी पवार,शहर अध्यक्षा शुभांगी साळुंखे,सत्वशीला पाटील, पुनम माळी,मणेराजुरीच्या तोडकरताई यानी आज तासगाव तहसिलदार यांना निवेदन दिले.तसेच सर्व महिलांच्या याबाबत तीव्र भावना असून आमच्या मागण्या आपल्या मार्फत शासन दरबारी कळवा अशी विनंती केली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.