प्रतिष्ठा न्यूज

सिंहगड पंढरपूरच्या दोन विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्तरीय अविष्कार २०२३-२४ संशोधन महोत्सवात प्रथम पारितोषिक

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे आयोजित चौदाव्या आंतर महाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय “अविष्कार २०२३-२४” या संशोधन महोत्सवात एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथील पदवी विभागाच्या १२ व पीएचडी च्या ४ विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्पांसह सहभाग नोंदविला होता. या संशोधन महोत्सवात ६ प्रवर्गातून ४०० हून जास्त संशोधकांनी सहभाग नोंदवला होता, त्यामधील पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन प्रकल्पांना प्रथम पारितोषिक मिळाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या मध्ये कुमार विनायक ऐवळे या विद्यार्थ्यांस मेडिसिन अँड फार्मसी प्रवर्गातून प्रथम पारितोषिक व कुमार नियंता शेंडगे या विद्यार्थ्यांस कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ या प्रवर्गातून प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे. सोलापूर विद्यापीठ आयोजित अविष्कार स्पर्धेत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील समन्वयक प्रा. गणेश लकडे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा उमेश घोलप व प्रा. अविनाश हराळे यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्याचे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे दि १२ ते १५ जानेवारी २०२४ ला होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.