प्रतिष्ठा न्यूज

यशवंत शुगर,नागेवाडी कार्यस्थळावर तोडणी वाहतूक करार शुभारंभ

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सन २०२३-२४ गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या यंत्रणेच्या कराराचा शुभारंभ आज कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.
भारती शुगरचे चेअरमन ऋषिकेश महेंद्र लाड व उपस्थित तोडणी वाहतूक कंत्राटदार,वाहन मालक यांच्या शुभहस्ते करारपत्रांचे पूजन करण्यात आले.यशवंत शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
पहिले ५ करार करण्याचा मान मिळालेल्या वाहन मालकांचा ऋषिकेश लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी दिघंची,आटपाडी,जत, मंगळवेढा,खानापूर व तासगाव तालुक्यातील अनेक तोडणी वाहतूक कंत्राटदार व वाहन मालक उपस्थित होते.यावेळी बोलताना ऋषिकेश लाड म्हणाले येणारा गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी सुरू केली असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांच्या ऊसाच्या नोंदी घेण्याचे काम सुरू झाले आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या उसाच्या नोंदी कारखान्याच्या शेती विभागाकडे कराव्यात.ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी सक्षम तोडणी यंत्रणा उभी करणार असून परिसरातील ऊस तोडणी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या वाहन मालकांनी आपले करार कारखान्याकडे करावेत.
यावेळी यशवंत शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील, श्रीपती शुगरचे शेती अधिकारी दरीगौडा,परचेस मॅनेजर प्रसाद गोकावे,फायनान्स मॅनेजर आनंद मोहोळकर,पर्यावरण व्यवस्थापक अशोक सूर्यवंशी,एच आर मॅनेजर रणजित जाधव,ॲग्री सुपरवायझर ओंकार पाटील,उत्तम ढेरे,सुर्यकांत पाटील,संतोष बाबर, सौ.सारिका माने,महेश ढाणे, सर्जेराव वावरे,प्रणव औटे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.