प्रतिष्ठा न्यूज

थोर क्रांतीकारी संत महात्मा बसवेश्वर यांचे विचार आचरणात आणावे : ज्योतीताई आदाटे

प्रतिष्ठा न्यूज
शिरोळ प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ गावात श्री महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान मालेत ज्योती ताई प्रमुख वक्त्या होत्या त्या म्हणाल्या बसवेश्वर महाराज यांनी शेकडो वर्षांपुर्वी बुरसटलेल्या मनुच्या विचारांना तिलांजली दिली त्यांनी शोषण करणाऱ्या रुढी परंपरा अंधश्रद्धा कर्मकांड यांना तीव्र विरोध केला.त्यांनी समतेचा पुरस्कार केला.तसेच या थोर महात्म्याने अनुभव मंडपाची स्थापना केली त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना स्थान होते महिलांना त्यांनी विषेश स्थान दिले.त्यांनी वेदप्रामाण्य नाकारले .भेदभावाला मुठमाती दिली. त्यासाठी त्यांनी फार सोसलं आपले आयुष्य परिवर्तनासाठी झिजवलं आणि आपण काय करतो केवळ त्यांची जयंती साजरी करतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात अनेक रुढी परंपरा कर्मकांड अंधश्रद्धा जोपासुन त्यांच्या विचारांनाच तिलांजली देत असतो. हे चुकीचे आहे. त्यांना आपण खर्या अर्थाने मानत असाल तर त्यांचे क्रांतीकारी विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. पुढे त्यांनी महिलांच्या सामाजिक प्रश्नावर विविध अंगाने परामर्श घेतला महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवनाचा प्रवास मांडला.
या व्याख्यान मालेचे प्रमुख संयोजक मनोजकुमार रणदिवे म्हणाले की आज या व्याख्यान मालेत प्रमुख वक्त्या म्हणून ज्योती ताई आदाटे यांना आमंत्रित केल्याने आम्ही धन्य झालो.अत्यंत वाईट अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात देऊन एखादी महिला फिनिक्स पक्षाप्रमाणे कशी उभी राहु शकते आणि समाजात आपली विशेष ओळख निर्माण करते त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या या ज्योती ताई.बेघर आणि अनाथ यांचं जीवन काय असतं हे त्यांनी वास्तवात जगल्या आहेत.काही वर्ष त्यांनी वृद्धाश्रमात घालविली आहे आज्यांची सेवा करुन त्यांनी शिक्षण पुर्ण केले .त्यानंतर झोपडपट्टीत हालाखीचे जीवन जगल्या हे जीवन जगत असतानाच एस एफ आय या विद्यार्थी संघटनेत सामील झाल्या आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही . आपले जीवन त्यांनी अगदी शुन्यातून विश्व निर्माण केले आहे.कोणतीही राजकीय सामाजिक पार्श्वभूमी नसताना सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत सलग तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी निवडुन येऊन हॅट्रीक नगरसेविका होण्याचा मान पटकावला आहे.माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना या समितीवर अध्यक्षा म्हणून सांगली जिल्ह्यात जोरदार कामगिरी करुन आपली या समितीवर छाप पाडली आहे अनेक वंचित घटकांना न्याय मिळवून दिला आहे.कोरोणाच्या काळात सुध्दा जिवाची पर्वा न करता वेगवेगळ्या भागात जाऊन या योजना पोहोचवल्या आहेत अगदी वारांगनाच्या दारात समितीला नेऊन सांगलीत इतिहास घडविला आहे.त्यांच्या विविध कामाची दखल घेऊन जयंत पाटील साहेबांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव पदावर त्यांची निवड केली. ज्योतीताईंनी राजकारणाकडे कधीच आपला व्यवसाय म्हणून पाहिले नाही त्यांनी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी अनेक छोटे मोठे व्यवसाय केले.गेल्या27 वर्षापासून त्या विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत त्यांना अमेरिकेचा जागतिक पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्या सामाजिक चळवळीत अगदी विद्यार्थी दशेपासुनच आहेत.गेल्या 35 वर्षांपासून अन्याय अत्याचार विरोधात लढणारी सामाजिक कार्यकर्ती अशी त्यांची ओळख आहे.त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांनी व त्यांच्या टीमने आर्थिक मानसिक शारीरिक शोषण करणाऱ्या अनेक भोंदुबाबांचा पर्दाफाश केला आहे.हे काम त्या व त्यांची टीम अगदी जिवावर उदार होऊन करतात.पुढच्या पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी अनेक शाळा कॉलेज मधुन चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिकेसहीत प्रबोधन केले आहे.त्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीत जिल्हा उपाध्यक्षा म्हणून सक्रिय आहेत.तसेच आकार फौंडेशनच्या त्या ट्रश्टी देखिल आहेत जिथे एक पालक किंवा अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व देण्याचे काम चालते या संस्थेत दाखल झालेल्या एका मुलीला शैक्षणिक दत्तक घेऊन त्यांनी त्यांनी समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. सांस्कृतिक क्षेत्रातही अग्रेसर आहेत त्या नाट्य व चित्रपट अभिनेत्री असुन त्यांनी जवळपास 22 चित्रपटात व अनेक नाटकांमधून अभिनेत्री म्हणून काम केले आहे त्या स्वत अखिल भारतीय नाट्य व चित्रपट महामंडळावर आजीव सभासद आहेत.अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्योतीताई ज्यांनी स्वतः आपल्या पित्याच्या पार्थिव देहाला सगळ्या रुढी परंपरा झुगारून अग्नी दिला तसेच आपल्या आज्जीला महिला सहकार्यांना सोबत घेऊन खांदा दिला व आपल्या आईला शिकाळ धरायला लावले तसेच आज्जीच्या अस्थी नदीत विसर्जन न करता अस्थींचे विसर्जन लेकाच्या हातुन झाडांच्यात घालून निसर्गाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला.हि त्यांची कृती म्हणजे वंशाला दिवाच हवा या पुरुषी समाज व्यवस्थेला चपराकच. अशा या सातत्याने प्रवाहाच्या विरोधात लढणार्या आणि समाजासाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या ज्या वास्तवात महापुरुषाचा वारसा जपण्याचा प्रयत्न करीत असतात अशा ज्योती ताई आमच्या या व्याख्यान माले साठी वक्त्या म्हणून आम्हाला लाभल्या याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.यावेळी‌ त्यांच्या सोबत आलेल्या धडाडीच्या कार्यकर्त्या प्रियांका तुपलोंडे आणि राणी कदम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी या व्याख्यानास अनेक नगरसेवक सरपंच अधिकारी पदाधिकारी तसेच असंख्य संख्येने गावातील लोक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.