प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील शासकीय वस्तीग्रहच्या मुलाचा प्रश्न नाही सुटल्यास, शेजारी असणाऱ्या पालकमंत्र्यांच्या घरासमोरच मुलांना घेऊन उपोषण करणार : राज्य प्रवक्ते संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह,शंभर फुटी रोड, विश्रामबाग, सांगली या ठिकाणी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांच्यासाठी राहण्याची व जेवणाची सोय राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाकडून केली जाते.प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा जेवण,राहणे, येण्या-जाण्याचा भत्ता, स्टेशनरी या सहित सहा हजार दोनशे रुपये प्रति एका मुलांना समाज कल्याण विभागाकडून मिळत असतात. परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वस्तीग्रहा मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे म्हणून तेथील राहणाऱ्या मुलाने या वस्तीग्रहाच्या समोरच सर्वांनी एकत्र बसून एक दिवसाचा अन्न त्याग केला आहे. त्यावेळेला भेट देण्यासाठी आलेले मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांना सांगितले की या वस्तीगृहामध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या जवळचा पाखरे नावाचा एक ठेकेदार या ठिकाणी जेवण तयार करून मुलांना जेवण देण्याचा ठेका घेतला आहे, परंतु हा ठेकेदार मुलांना दमदाटी करतो चार दिवसाचे शिळे अन्न देतो, निकृष्ट दर्जाचे व अपुरे अन्न मुलांना देत आहे.त्या ठिकाणी शासकीय नियमानुसार मुलांना ज्या पद्धतीने सर्व देण्याची व्यवस्था असते म्हणजेच नियमानुसार त्या ठिकाणी रोजच्या जेवणामध्ये दोन भाज्या मिळणे आवश्यक असते, ऋतुमानानुसार फळे, पापड, अंडी याच्यात अनियमित असणे, दुधात जास्त प्रमाणात पाणी मिसळणे, कधीच तूप न देणे, तांदूळ हा क दर्जाचा म्हणजेच भरडा वापरला जातो, कुचकी सडलेली खराब दर्जाची फळे व भाजीपाला या ठिकाणी देतात, एकच भाजी वारंवार देतात, ठेकेदाराकडून अयोग्य भाषा, शिव्या देणे व दमदाटी करून मारहाण करणे, पाच महिन्यापासून निर्वाह भत्ता मिळालेला नाही, दोन वर्षापासून शैक्षणिक खर्च व शैक्षणिक बिल मिळाली नाही, म्हणून आम्ही सर्वजण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह विश्रामबाग सांगली यांच्यासमोर एक दिवसाचा अन्न त्याग केला आहे असे सांगितले यावर स्वराज्य संभाजी राजे प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की लवकरच त्यांची चौकशी लावून त्या ठिकाणी त्यांची विचारपूस करून भविष्य काळामध्ये हा विषय गंभीर आहे आणि नाही सुटला तर याच ठिकाणी अगदी शंभर मीटरच्या अंतरावर असणारे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांचे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाच्या समोर च आपण सर्वजण त्या ठिकाणी उपोषणाला बसून हा विषय निकालात काढूया व मी मराठा स्वराज्य संघाचा आपणास पाठिंबा दिला.या वेळेला राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे मा. उत्तम आबा कांबळे, आरपीआयचे मा.सुरेश दुधगावकर साहेब, विनायक हेगडे वंचित आघाडीचे महावीर कांबळे, नितीन माने, राहुल साबळे, कबीर वानखंडे, अविनाश कांबळे, व अनेक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून सर्वांनी पाठिंबा दिला व या प्रश्नावर वाचा फोडायचे असे सर्वांनी आश्वासन दिले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.