प्रतिष्ठा न्यूज

शिराळा नागपंचमी यात्रेमुळे 9 ऑगस्ट रोजी पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 5 : सांगली जिल्ह्यातून जवाहर नवोदय विद्यालय, पलूस येथे इयत्ता 6 वी मध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता 80 जागा भरण्यात येणार आहेत. ही प्रवेश परीक्षा शनिवार, दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या वेळेत घेतली जाणार आहे. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत 20 जुलै 2024 ते 16 सप्टेंबर 2024 आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज मुदतीमध्ये भरावेत, असे आवाहन प्राचार्य ए. एस. कांबळे यांनी केले आहे.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ www.navodaya.gov.in / https://navodaya.gov.in वर संपर्क साधावा. पात्र उमेदवार हा संबंधित जिल्ह्यातील असावा. ऑनलाईन अर्ज करताना ते इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून योग्य रित्या भरलेले प्रमाणपत्र ज्यावर स्वतःचे अलीकडील काळात काढलेले छायाचित्र (Photo), विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकाकडून प्रतिहस्ताक्षरित केलेले प्रमाणपत्र (jpg स्वरुपात 10kb-100kb प्रमाणात) ऑनलाईन अपलोड करावयाचे आहे. विद्यार्थ्यांचा जन्म हा 1 मे 2013 ते 31 जुलै 2015 दरम्यान झालेला असावा, असे प्राचार्य श्री. कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.