प्रतिष्ठा न्यूज

संबधीत अधीकाऱ्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करा…आमदार सुमनताई पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: मणेराजुरी व परिसरातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तासगाव महाविद्यालयात एसटीने शिक्षणासाठी येतात.या विद्यार्थ्यांनी येताना आणि जाताना वेळेवर एस टी मिळत नसल्या बद्दल अनेक वेळा आमदार सुमनताई पाटील यांच्या कडे तक्रारी केल्या होत्या.त्यावेळी पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यां बरोबर बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासंबंधात सूचना केल्या होत्या.परंतु कवठेमहांकाळ डेपो मॅनेजर यांनी याबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही.आज मनेराजुरी व आजूबाजूच्या विद्यार्थ्यांची पुन्हा गैरसोय झाल्याने आक्रमक होत विद्यार्थ्यांनी गावातील लोकप्रतिनिधींना सांगून संबंधित डेपो मॅनेजरशी संपर्क साधला,परंतु डेपो मॅनेजरने उडवाउडविची उत्तरे देऊन लोकप्रतिनिधींना उद्धटपणाने उत्तरे दिली. तसेच कवठेमहंकाळ आगारातील वाहन चालक याने मुलींना अर्वाचपने बोलून आमदार म्हणून सुमनताई बद्दल अनुद्गार काढले. त्यामुळे कवठेमंकाळ डेपो मॅनेजर यांच्या विरोधात मनेराजुरी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी तासगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.