प्रतिष्ठा न्यूज

तासगावात अभियंता दिन संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील ग्रीन रोटरी सेंटरमध्ये आज “अभियंता दिन” कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी बोलताना मा.उज्वल साठे म्हनाले की आपण अभियंते लोकांची घरं त्यांना हवी तशी बांधून देतो, त्यातून आपण पैसेही चांगले कमावतो,मात्र त्या पैशांचे योग्य नियोजन आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक नियोजन करायचे राहून जाते. कोणत्याही क्षेत्रात काम करत असलेल्या अभियंत्याने मिळविलेल्या पैशाचे नियोजन करणे आवश्यक आहे.कारण पैसा मिळविणे सोपे असते परंतु तो सांभाळणे अतिशय अवघड असते.असे प्रतिपादन त्यांनी केले.मा.उज्वल साठे हे ऑटोमोबाईल इंजिनियर असून ते तासगांवचे सुपुत्र आहेत.सुप्रसिद्ध १०८ रुग्णवाहिका तसेच विविध स्वयंचलीत कचरा गाड्या,वातानुकुलीत आणि सर्व सोयींनी युक्त अशा प्रवासी गाड्या यांच्या निर्मितीमध्ये त्यांचा हातखंडा असून ते या क्षेत्रात भारतभर प्रसिद्ध आहेत.
रोटरी क्लब तासगांव आणि तासगांव तालुका इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.दीप प्रज्वलननाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.सर एम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पूजन झाले. सामुदायिक राष्ट्रगीतानंतर इंजिनीअर्स असोसिएशनचे नूतन अध्यक्ष मा. अनिल जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.असो सिएशनचे मावळते अध्यक्ष आणि प्रथितयश स्थापत्य अभियंते संजय नाईक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.सांगली जिल्हा सुशिक्षित बेकार अभियंता संघटनेने गेल्या वर्षातील उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरविलेल्या ओंकार शेटे आणि दिपक ढेकणे या दोघांचा तसेच वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल जेष्ठ अभियंता मा. विनायक थोरात आणि अनिल मिरजकर या दोघांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला असोसिएशनचे नूतन कोषाध्यक्ष मा.मिलींद सुतार यांची जागृत ग्राहक संघटनेच्या कोल्हापूर विभागीय संघटकपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणी सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.रोटरी क्लब तासगांवचे अध्यक्ष मा.राहुल तेली यांनी अध्यक्षीय भाषण करताना अभियंता हा समाजातील महत्वाचा घटक असल्याचे सांगितले.त्यांनी अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ती पुढीलप्रमाणे अध्यक्ष अनिल जाधव,उपाध्यक्ष राजेश यादव,सचिव सुनिल निपाणीकर,कोषाध्यक्ष मिलींद सुतार तसेच अश्विन कोकणे, युवराज लुगडे,प्रकाश संकपाळ,सुरेश कणसे, सतिश पाटील,दिग्विजय खरमाटे, रणजीत कोळी यानंतर मा.कोकणे यांनी आभार प्रदर्शन केले.सूत्र संचालन मा. मिलींद सुतार यांनी केले. यावेळी रोटरी क्लबचे सदस्य असलेले आणि अभियंता असलेले मा.तानाजी पाटील,मा.किशोर पाटील यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य आणि तासगांव तालुक्यातील अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.