प्रतिष्ठा न्यूज

बुधवारी तासगावच्या श्रीं चा 244 वा रथोत्सव : उत्सवाची जय्यत तयारी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : भाद्रपद शुक्‍ल प्रतिपदा १६ सप्‍टेंबर पासून तासगावच्या श्री गणपति पंचायतन देवस्‍थानच्या २४४ व्या गणेशोत्‍सवास प्रारंभ झाला आहे. सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी चालू केलेल्‍या या उत्‍सवाचे विशेष म्‍हणजे येथील गणपति मंदिरातील श्री गणेशमूर्ती ही उजव्‍या सोंडेची असून हा गणपति नवसाला पावणारा म्‍हणून प्रसिद्ध आहे.१६ सप्‍टेंबरला दुपारी १२ वाजता ‘श्रीं’ची षोडशोपचार महापूजा आणि आरती संपन्न झाली.दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ पर्यंत ह.भ.प. गजाननबुवा वाठारकर यांचे नारदीय कीर्तन,तसेच सायंकाळी ६ ते रात्री ७ या वेळेत ‘श्रीं’चा छबिना झाला.यावेळी भजन,पोवाडे आणि गायन असा कार्यक्रम झाला.
१७ तारखेला रात्री ७.३० ते ८.३० श्री.राजेंद्र पटवर्धन यांचे शास्‍त्रीय सतारवादन होणार आहे.१९ सप्‍टेंबर म्‍हणजे गणेशचतुर्थीच्‍या दिवशी सकाळी ११ वाजता ‘श्रीं’च्‍या मूर्तीचे श्रीमंत पटवर्धन राजवाड्यात आगमन, सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजता ‘श्रीं’ची १ सहस्र दुर्वायुक्‍त महापूजा होईल.याचे पौरोहित्‍य पंडित अनंतशास्‍त्री जोशी करतील.रात्री ८ ते ९ या वेळेत श्री गणपति मंदिर येथे श्रींचा मंत्रजागर होईल.
*बुधवार २० सप्‍टेंबरला ‘श्रीं’चा २४४ वा रथोत्‍सव*
बुधवार २० सप्‍टेंबरला दुपारी १ ते सायंकाळी ५ पर्यंत २४४ वा रथोत्‍सव होईल.या रथोत्‍सवास श्री गणपति मंदिर येथून प्रारंभ होईल.तो काशीविश्‍वेश्‍वर मंदिर येथे जाऊन परत श्री गणपति मंदिर येथे येईल.
२१ सप्‍टेंबरला रात्री ९ वाजता पंडित गजाननबुवा वाठारकर यांच्‍या कीर्तनाने उत्‍सवाची सांगता होईल. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्‍यावा,असे आवाहन श्री.गणपती पंचायतन देवस्थानचें विश्वस्थ श्री राजेंद्र पटवर्धन,श्री राहुल पटवर्धन,श्री पवन सिंह कुडमल,श्री अथर्व जोशी यांनी केले आहे आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.