प्रतिष्ठा न्यूज

तासगांव मार्केट यार्डात चालू बेदाणा हंगामातील नवीन बेदाणा विक्रीस प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : कृषि उत्पन्न बाजार समिती, तासगांवच्या गुरुवार दिनांक: २५/०१/२०२४ रोजी चालू वर्षातील नविन बेदाण्याच्या सौद्यास सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक सुरेश भाऊ पाटील, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तासगांव श्रीमती रंजना बारहत्ते, बाजार समितीचे सभापती  युवराजदादा उर्फ सुनिल भानुदास पाटील,बाजार समितीचे उपसभापती, रामचंद्र सत्तू जाधव,व संचालक बाजार समितीचे संचालक रविंद्र वसंत पाटील,खंडू उर्फ रामचंद्र विठ्ठल पवार, अनिल विश्वासराव पाटील,अंकुश सदाशिव माळी,सुदाम लक्ष्मण माळी, कुमार रामचंद्र शेटे यांचे उपस्थितीत मे.सतिश ट्रेडींग या आडत दुकानात बेदाणे सौद्यास प्रारंभ झाला.सदरचे सौदे २५ दुकांनामध्ये झाले.
न्यु जानसी ट्रेडर्स प्रो. प्रा.पंजाबराव माने यांचे दुकांनामध्ये आमसिध्द शिवाप्पा सोरडी मु.पो.घोणसगी ता. तिकोटा,जि.विजापूर या शेतकऱ्याच्या मालास रु. २११/- इतका उच्चांकी दर मिळाला, तो माल मे.अमोद्य अॅग्रोटेक यांनी खरेदी केला.तसेच धारेश्वर ट्रेडींग प्रो.प्रा.भूपाल पाटील यांचे दुकांनामध्ये लिंगाप्पा सोमलिंग उमरानी. रा.जकादबोबलाद ता.जत. जि. सांगली या शेतकऱ्याच्या मालास रु. २०१/- दर मिळाला,सदरचा माल तांबडे अँग्रोटेक यांनी खरेदी केला.
बाजार आवारात एकुण २५ अडत दुकांनात ११० टन नविन हिरव्या बेदाण्याची आवक होऊन विक्री झाली. त्याचे दर साधरणता रु. ९० ते रु. २११ रुपये प्रति किलो दराने नविन मालाची विक्री झाली.बाजार आवारात एकुण आवक – ७,३४३ बॉक्सची (११ गाड्या) ची होवून प्रत्यक्ष ७३४३ बॉक्सची (११ गाड्या) विक्री झाली आहे.त्याचे दर प्रति किलो रु. खालीलप्रमाणे.
दर – हिरवा बेदाणा रुपये ९० ते २११, पिवळा बेदाणा रुपये ८७ते १७५ व काळा असे दर मिळाले आहेत. त्यामुळे नवीन बेदाणास उच्चांकी दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
सदर सौद्यास बाजार समितीचे सचिव, चंद्रकांत सुर्यवंशी,सहाय्यक सचिव चंद्रकांत कणसे,असोशिऐशनचे अध्यक्ष राजू कुंभार,मनोज मालू, राहुल मालू,केतन भाई,राम माळी, सुभाष हिंगमीरे,रितेश मज्जेठिय्या, सतिश माळी,उत्तम पाटील,राहुल बाफना,पणू सरडा,सुशिल हडदरे, सुनिल हडदरे,बबलू पाटील,जगन्नाथ घणेरे,संजय बोथरा,अणुज बन्सल, किरण बोडके,जगदीश राजमाने, संतोष कोष्टी,भूपाल पाटील,गुलषन अग्रवाल,बालाजी जाधव,राकेश माहेश्वरी,मुन्ना मुंदडा,ओकांर सूर्यवंशी, संदिप मालानी,नितीन अट्टल,परेश मालू,कृष्णा मर्दा,योगेश कबाडे व आवारातील सर्व खरेदीदार व्यापारी व सांगली,सोलापूर,व कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.सर्व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला बेदाणा तासगांव बाजार पेठेत सौद्या मध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती युवराजदादा उर्फ सुनिल भानुदास पाटील यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.