प्रतिष्ठा न्यूज

खाडे पब्लिक स्कूल मुलांची क्षेत्रभेटीमध्ये महानगरपालिका कंपोस्ट खताच्या प्रकल्पाला भेट

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली: मातोश्री तानुबाई दगडु खाडे पब्लिक स्कूल, मालगाव यांच्या वतीने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच एक म्हणजे क्षेत्रभेटी. क्षेत्रभेटीतून मुलांच्या सामान्यज्ञानात भर पडण्यास मदत होते. याचप्रमाणे खाडे स्कूलने आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या  कंपोस्ट खत प्रकल्पास भेट दिली. या प्रशंसनीय प्रकल्पासंदर्भात आरोग्य अधिकारी रविंद्र ताटे स्वच्छ्ता निरीक्षक अंजली कुदळे, मुकादम सुरज देवखुळे, सहकारी राहूल सुकटे व विक्रम वाघुळे आदींचे सहकार्य व मार्गर्शन लाभले. या शाळेच्या उपक्रमामुळे  विद्यार्थ्यांना या प्रकल्पाविषयी विस्तृत माहिती मिळाली. तसेच या उपक्रमाचा मुलांना भविष्यात नक्कीच उपयोग होईल, अशी आशा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी व्यक्त केली. तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवणे काळाची गरज असल्याचेही सांगितले.
         या उपक्रमासाठी शाळेतून मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील, समन्वयक ज्योत्स्ना माने, शिक्षक व सहकाऱ्यांचे विशेष प्रयत्न आहेत. तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे यांचेही मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.