प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत आज रविवारी सायंकाळी 5 वाजता विजयंता गणेश मंडळाकडून मारुती चौकात शोले इव्हेंट : स्टेजवर येणार गब्बर सिंग, बसंती, जेलर, कालिया सांबा, ठाकूर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीतील शोले स्टाईल पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक भीमराव चव्हाण यांच्या संकलपणेतून साकारण्यात आलेल्या शोले इज बॅक या कार्यक्रमाचा दुसरा शो आज रविवारी सायंकाळी 5 वाजता सांगलीच्या मारुती चौकात आयोजित करण्यात आला आहे. मारुती चौकातील 52 वर्षाची परंपरा असलेल्या विजयंत गणेश उत्सव मंडळाकडून शोलेचा कार्यक्रम आयोजित केला असून तो सर्वांसाठी मोफत आहे. *पै. पृथ्वीराज पवार, पै. गौतम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली* या शोले इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे.
*आज रविवार दिनांक 21 मे 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमाची सुरुवात बच्चन हिट्स कराओके गाण्याच्या कार्यक्रमाने होणार असून यानंतर मुख्य शोले इव्हेंट सादर केला जाणार आहे. यामध्ये *शोले चित्रपटातील सर्व गाणी, डायलॉग, महत्त्वाचे सीन तसेच पुन्हा एकदा या ठिकाणी रंगमंचावर पाहायला मिळणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे *शोले मधील सर्व कलाकार हुबेहूब दाखवले जाणार* असून एक कौटुंबिक असा शोले इव्हेंट पत्रकार दीपक चव्हाण आणि सोनाली केकडे यांनी निर्मित केला आहे.  शोले इज बॅक या कार्यक्रमाला स्टेशन चौकात हजारोंची उपस्थिती लावत सांगलीकर जनतेने प्रतिसाद दिला होता. तसाच प्रतिसाद आणि उपस्थिती रविवारी सांगलीच्या मारुती चौकात होणाऱ्या शोले इव्हेंट साठी दाखवावी असे आवाहन दीपक चव्हाण यानी केले आहे.
*आज रविवारी 21 मे रोजी सायंकाळी 5 वाजता शोलेचा दुसरा प्रयोग*
मारुती चौकात होत असून यासाठी शोलेचे सेटअपसुद्धा उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी पिक्चर मधील लोकप्रिय ठरलेल्या भूमिकेतील प्रती कलाकार म्हणून *जय, बसंती , बिरू , ठाकूर , गब्बर , जेलर बसंती , सांबा , कालिया हे मारुती चौकात स्टेजवर पाहायला मिळणार आहेत. *3 तासाचा भरगच्च मनोरंजन* करणारा कार्यक्रम म्हणजे शोले असून सोबत अमिताभ बच्चन यांच्या हिट गाण्याचा बहारदार कार्यक्रमसुधा होणार आहे आज रविवार सायंकाळी 5 वाजता
आपल्या सांगलीच्या मारुती चौकात आयोजित शोले इव्हेंट पाहण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक
विजयंता मंडळाकडून करण्यात आले आहे. हा *कार्यक्रम सर्वासाठी मोफत असून महिलांसाठी बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था* केल्याचेही विजयंता मंडळाचे अध्यक्ष विलास शिंदे , शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण आणि सोनाली केकडे यांनी सांगितले.
*कार्यक्रमाची गर्दी लक्षात घेता आपण वेळेत उपस्थिती लावावी*

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.