प्रतिष्ठा न्यूज

संजयकाकांच्या प्रचारासाठी किसान मोर्चा शेतकऱ्याच्या बांधावर जाणार : संदीप गिड्डे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी किसान मोर्चा शेतकऱ्याच्या बांधावर जाणार आहे. असे किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी सांगितले. सांगली येथे किसान मोर्चाची बैठकीत ते बोलत होते. भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग, सांगली जिल्हा अध्यक्ष राजाराम गरूड, धनाजी पाटील, सदाशिव देशिंगे, प्रदीप कार्वेकर, यशवंत मुळीक, दिलीप कदम, जयसिंग गुरव, अश्विनी तारळेकर, अनन्या तारळेकर पाटील उपस्थित होते.
संदीप गिड्डे म्हणाले मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. यापूर्वी कोणतेही अनुदान भ्रष्ट्राचारामुळे शेतकऱ्यांना मिळत नव्हते. परंतु मोदी सरकारने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे.  नमो शेतकरी योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांना चार हप्त्यात पाठवले जातात. प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत, नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते. या योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना विमा हप्ता भरावा लागत आहे. ज्यावर सरकार अनुदान देते. पीएम किसान मानधन योजनेंतर्गत सरकार दर महिन्याला शेतकऱ्यांना 3,000 रुपये पेन्शन देत आहे. या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत. जेव्हा शेतकरी वयाची 60 वर्षे पूर्ण करतात तेव्हा त्यांच्या खात्यावर दरमहा 3,000 रुपये पेन्शन पाठवली जाते. अशा अनेक योजना मोदी सरकारने राबविल्या आहेत. संजयकाका पाटील यांचा प्रचार करत असताना  या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.